जाहिरात

MP News: 11 इंच लोखंडी सळई तरुणाच्या गळ्यात आरपार घुसली, अपघात पाहून प्रत्यक्षदर्शींच्या पायाखालची जमीन सरकली

MP News: मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 30 वर्षीय सद्दाम या गवंडी कामगाराच्या गळ्यात 11 इंची लोखंडी सळई आरपार घुसली.

MP News: 11 इंच लोखंडी सळई तरुणाच्या गळ्यात आरपार घुसली, अपघात पाहून प्रत्यक्षदर्शींच्या पायाखालची जमीन सरकली
"Madhya Pradesh News: तरुणाच्या गळ्यात आरपार 11 इंचाची सळई घुसली"

MP News: मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून एक अतिशय भीषण आणि जीवघेणा अपघात समोर आला आहे. येथे एका गवंडी काम करणाऱ्या तरुणाच्या गळ्यात सुमारे 11 इंच लांब लोखंडी सळई आरपार घुसली. हा अपघात तरुणाच्या जिवावर बेतले होते, पण त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो थोडक्यात बचावला. तरुणाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याच्या गळ्यातून सळई यशस्वीपणे बाहेर काढली.

तरुणाच्या गळ्यात कशी घुसली सळई?

हे प्रकरण आनंद नगरमधील आहे. सद्दाम (वय 30 वर्षे) हा व्यवसायाने गवंडी असून 1 एप्रिल रोजी बांधकाम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि 11 इंची लोखंडी सळई त्याच्या गळ्यात घुसली. हा अपघात इतका भयानक होता की आजूबाजूला उभे असलेले लोक हादरून गेले. सद्दामला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तिथून त्याला इंदूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला. 

11 इंचाच्या सळईसह सद्दाम पोहोचला रुग्णालयात

मिळालेल्या माहितीनुसार, सद्दामला गळ्याच्या आरपार घुसलेल्या 11 इंची लोखंडी सळईसह रुग्णालयात नेण्यात आले. सद्दामची अवस्था पाहून प्रत्यक्षदर्शींच्या पायाखालची जमीन सरकली. खरगोन जिल्हा रुग्णालयाने सद्दामची प्रकृती पाहून प्राथमिक उपचारानंतर त्याला इंदूरच्या एम. वाय. (MY) रुग्णालयात पाठवले, जिथे डॉक्टरांच्या टीमने तत्काळ उपचार सुरू केले.

(नक्की वाचा: Mumbai News: मुंबईच्या सर्व शाळांमध्ये आता मनाचे श्लोक सक्तीचे? माजी महापौरांच्या प्रस्तावामुळे नवा वाद पेटला)

गले से आर-पार हुए सरिये के साथ युवक को अस्पताल पहुंचाया गया

सद्दामच्या गळ्यात 11 इंच लोखंडी सळई घुसली

डॉक्टरांच्या पथकाने तातडीने केली शस्त्रक्रिया

एम. वाय. रुग्णालयाचे शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. अरविंद शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या पथकाने तरुणाच्या गळ्यात अडकलेली सळई काढण्यासाठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. या टीममध्ये डॉ. अविनाश गौतम, डॉ. उपेंद्र पांडे, डॉ. रामेंद्र गुर्जर, सिनियर रेसिडेंट डॉ. सुब्रजीत नायक आणि इतर कनिष्ठ डॉक्टरांचा समावेश होता. या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे सद्दामच्या गळ्यातील सळई यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. डॉक्टरांसमोर सर्वात मोठे आव्हान हे होते की, 11 इंच लांब सळईमुळे कोणत्याही क्षणी रुग्णाचा मृत्यू होऊ शकला असता, कारण सळई गळ्यात खोलवर अडकली होती. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या पथकाने अत्यंत सावधगिरीने आणि अचूकतेने शस्त्रक्रिया पार पाडली.

(नक्की वाचा: Mhada Office: म्हाडाच्या वांद्रे कार्यालयात खळबळ; पिण्याच्या पाण्यात जिवंत अळ्या पाहून कर्मचाऱ्यांची उडाली झोप )

रुग्णाची प्रकृती स्थिर

ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात Anesthesia विभागाचीही महत्त्वाची भूमिका राहिली. विभाग प्रमुख डॉ. शालिनी जैन आणि त्यांच्या आपत्कालीन पथकाने संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची प्रकृती स्थिर ठेवली. शस्त्रक्रियेनंतर सध्या सद्दामची प्रकृती स्थिर असून त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com