जाहिरात

Trending News: चित्त्यांचा 'शाही' थाट! मटणावरचा दररोजचा खर्च ऐकून हैराण व्हाल, सरकारने मांडला हिशोब

भोजनाच्या कमतरतेमुळे वन्यजीवांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सरकारने फेटाळून लावले असून, सर्व चित्ते सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

Trending News: चित्त्यांचा 'शाही' थाट! मटणावरचा दररोजचा खर्च ऐकून हैराण व्हाल, सरकारने मांडला हिशोब
  • कूनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या मांसाहारासाठी दररोज सरासरी ३४,८२५ रुपये खर्च केले जातात
  • आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये चित्त्यांच्या मांसासाठी सरकारने १.२७ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे
  • सध्या कूनोमध्ये ३५ चित्ते वास्तव्यास असून आठ नवीन चित्ते बोत्सवाना येथून आणण्याची तयारी आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Kuno National Park Cheetah Food Expense: मध्य प्रदेशातील कूनो नॅशनल पार्क सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. इथे चित्तेही पाहायला मिळतात. पण त्याच वेळी इथल्या चित्त्यांच्या पुनर्वसन प्रकल्पाचा खर्च सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, या चित्त्यांच्या खाद्यासाठी, विशेषतः मटणासाठी दररोज किती रुपयांचा खर्च येतो याची माहिती समोर आली आहे. शिवाय वर्षासाठी येणाऱ्या खर्चाचा ही लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तो आकडा पाहाता या चित्त्यांचा जणू राजेशाही थाट असल्याचीच चर्चा सुरू आहे. 

या चित्त्यांना दररोज मटण दिले जाते. तो त्यांच्या डायेटचा भाग आहे. त्यासाठी दररोज सरासरी 34 हजार 825 रुपयांचे मटण त्यांना खाण्यासाठी दिले जाते. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी लेखी उत्तरात माहिती दिली की, 2024-25 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 1.27 कोटी रुपयांहून अधिक रक्कम केवळ बकऱ्याच्या मांसावर खर्च करण्यात आली आहे. म्हणजेच या चित्त्यांच्या मटणापोटी सरकारने तब्बल सव्वा कोटी रूपये खर्च केले आहेत. वर्षासाठी केलेला हा खर्च आहे. हा खर्च पाहून सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.  

नक्की वाचा - Inspirational Story: परिस्थितीमुळे शाळा सोडली, क्लीनर म्हणून काम केले, आज आहे सोशल मीडिया स्टार

धक्कादायक बाब म्हणजे, चित्त्यांच्या या शाही भोजनासाठी स्वतंत्र बजेटची तरतूद नाही. गरजेनुसार इतर विभागांतील निधी वळवून हा खर्च भागवला जात आहे. सध्या कूनोमध्ये 35 चित्ते (प्रौढ आणि शावक मिळून) वास्तव्यास आहेत. वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या मांसाचा पुरवठा निश्चित केला जातो. एकीकडे चित्त्यांच्या संख्येसाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे बिबट्यांकडून होणारी पाळीव प्राण्यांची शिकार आणि या प्रकल्पावरील आर्थिक बोजा यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

नक्की वाचा - Alcoholic Husband: मद्यपी नवऱ्यांना बसणार चाप!, बायकोच्या परवानगी शिवाय दारू प्याल तर थेट जेलमध्ये जाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2022 रोजी नामिबियातून आणलेले चित्ते सोडल्यानंतर हा प्रकल्प सुरू झाला होता. आता 28 फेब्रुवारीला बोत्सवाना येथून आणखी 8 नवीन चित्ते भारतात येणार आहेत. त्यामुळे हा खर्च अजून वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, बिबट्यांच्या शिकारीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती असली तरी, सरकारने वन्यप्राण्यांच्या खाद्यात कोणतीही कमतरता नसल्याचा दावा केला आहे. मध्य प्रदेश सरकारने कूनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांच्या देखभालीवर होणाऱ्या खर्चाचा तपशील विधानसभेत जाहीर केला आहे. या वर्षात चित्त्यांच्या मांसाहारावर एकूण 1,27,10,870 रुपये खर्च झाले आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली या चित्त्यांच्या आरोग्याची आणि पोषणाची काळजी घेतली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • दैनंदिन खर्च: मटणावर दररोज सरासरी 34,825 रुपये खर्च.
  • चित्त्यांची संख्या: कूनोमध्ये सध्या एकूण 35 चित्ते वास्तव्यास आहेत.
  • नवीन पाहुणे: 28 फेब्रुवारीला बोत्सवाना येथून 8 नवीन चित्ते येणार.
  • दुसरे घर: कूनोनंतर आता 'गांधी सागर अभयारण्य' चित्त्यांचे दुसरे निवासस्थान म्हणून सज्ज झाले आहे.
  • भोजनाच्या कमतरतेमुळे वन्यजीवांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सरकारने फेटाळून लावले असून, सर्व चित्ते सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com