Trending News: रात्रीचे 3 तास, सुनसान बस स्टॉप अन् 40 टवाळखोर! लेडी IPS अधिकाऱ्याचे धाडसी 'स्टिंग ऑपरेशन'

महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची पावले उचलली गेल्यामुळे सर्व स्तरांतून सुमती यांचे कौतुक होत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • हैदराबादमधील पोलीस उपायुक्त सुमती यांनी रात्रीच्या वेळी महिला सुरक्षित आहेत का याचे स्टिंग ऑपरेशन केले
  • 3 तासांच्या कालावधीत निर्जन बसस्थानकावर साध्या वेशात त्या उभ्या होत्या, यावेळी 40 जणांनी त्याची छेड काढली
  • छेडछाड करणाऱ्यांमध्ये तरुण विद्यार्थी आणि नोकरी करणारे युवक मुख्य होते ज्यात अनेक जण नशेतही होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

शहरात रात्रीच्या वेळी महिला खरोखरच सुरक्षित आहेत का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हैदराबादमधील मलकाजगिरीच्या पोलीस उपायुक्त (DCP) सुमती यांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. कोणत्याही सुरक्षेविना, साध्या वेशात त्यांनी मध्यरात्री बसस्थानकावर घालवलेल्या 3 तासांनी पुरुषी मानसिकतेचे धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. रात्रीच्या वेळी एकटी महिला रस्त्यावरून जात असेल, तर समाज तिच्याकडे कोणत्या नजरेने बघतो? हे जाणून घेण्यासाठी एका महिला IPS अधिकाऱ्याने चक्क 'स्टिंग ऑपरेशन' केले. हैदराबादच्या मलकाजगिरी भागातील पोलीस आयुक्त सुमती यांनी रात्री साडेबारा ते साडेतीन वाजेपर्यंत बस स्टॉपवर एकटीने थांबून पुरुषांची परीक्षा घेतली. पण या परीक्षेचा निकाल अत्यंत चिंताजनक लागला आहे.

नेमका प्रकार काय?
DCP सुमती यांनी रात्री 12:30 ते पहाटे 3:30 या वेळेत एका निर्जन बसस्थानकावर सामान्य महिलेप्रमाणे उभे राहून हे ऑपरेशन राबवले. या 3 तासांच्या कालावधीत तब्बल 40 पुरुषांनी त्यांना गाठले. यात प्रामुख्याने तरुणांचा समावेश होता, जे अंमली पदार्थांच्या किंवा दारूच्या नशेत होते. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आपल्या समोर उभी आहे, याची पुसटशी कल्पनाही या टवाळखोरांना नव्हती. त्यांनी त्यांची छेड काढण्याचा ही प्रयत्न केला. ही बाब सर्वात धक्कादायक होती. त्यातून महिला किती सुरक्षित आहेत हे समोर आले. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News: मुलाचा गळा दाबला, लेकीला संपवलं, बापाच्या कृत्यानं गाव हादरलं, पण नियतीन असं काही चक्र फिरवलं की...

कायदेशीर कारवाई आणि समुपदेशन
या मोहिमेचा उद्देश केवळ गुन्हे दाखल करणे हा नव्हता, तर जमिनीवरील परिस्थिती जाणून घेणे हा होता. पोलिसांनी या सर्व 40 व्यक्तींची ओळख पटवून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावले. तिथे त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी महिलांशी कसे वागावे, याबाबत त्यांना सज्जड दम ही देण्यात आला आहे. DCP सुमती  यांच्या या स्टंग ऑपरेशनचं सध्या कौतूक होत आहे. त्यांनीच स्वत: पुढाकार घेवून ग्राऊंडवर काय स्थिती आहे. महिलांना काय अडचणी येत आहेत याचाच जणू आढावा घेतला. 

नक्की वाचा - Tamil Nadu Election: थलपती विजय मॅजिक फिगरच्या जवळ! तामिळनाडूत पडद्या मागे काय-काय घडतयं?

तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
केवळ 3 तासांत 40 पुरुषांनी त्यांच्याशी संपर्क साधून अश्लील चाळे किंवा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे यात शिकणारे विद्यार्थी आणि नोकरी करणारे तरुण मोठ्या संख्येने होते. अनेकजण गांजा किंवा दारूच्या नशेत होते. रक्षणकर्तीच समोर उभी आहे हे न ओळखून त्यांनी आपली मर्यादा ओळंडली. IPS सुमती यांच्या या धाडसामुळे हैदराबादमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या टवाळखोरांना अटक करण्याऐवजी त्यांच्या पालकांसमोर त्यांचे समुपदेशन केले. महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची पावले उचलली गेल्यामुळे सर्व स्तरांतून सुमती यांचे कौतुक होत आहे.