Shocking News: 3 मिनिटे मुलगा लिफ्टमध्ये अडकला.. घाबरलेल्या पित्याचा जीव गेला, मन सुन्न करणारी घटना

Bhopal Heart Attack News: छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि ते बेशुद्ध पडले. सुमारे तीन मिनिटांनी, मुलगा लिफ्टमधून बाहेर आला, परंतु वडिलांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जाहिरात
Read Time: 2 mins

भोपाळ: भोपाळमधील एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. भोपाळच्या  जाटखेडी भागात एक 8 वर्षीय मुलगा लिफ्टमध्ये अडकला. मुलाला लिफ्टमध्ये अडकल्याचे पाहताच घाबरुन त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेत लिफ्टमध्ये अडकलेला मुलगा वाचला मात्र दुर्दैवाने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, भोपाळमधील जाटखेडी भागातील एका हायप्रोफाईल कॉलनीत वीज गेल्यामुळे 8 वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला. मुलाच्या वडिलांना हे कळताच ते जनरेटर सुरू करण्यासाठी गार्ड रूमकडे धावले. त्यानंतर त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि ते बेशुद्ध पडले. सुमारे तीन मिनिटांनी, मुलगा लिफ्टमधून बाहेर आला, परंतु वडिलांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिसरोड पोलिसांनी सांगितले की, 51 वर्षीय ऋषिराज भटनागर हे जाटखेडी येथील निरुपम रॉयल फार्म व्हिला कॉलनीतील टॉवर नंबर 1 मधील फ्लॅट नंबर 307 मध्ये राहत होते. ते विमा आणि प्रॉपर्टीमध्ये काम करायचे. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुले हर्षित आणि देवांस ( वय, 8) असे चौघेजण राहतात. सोमवारी रात्री साडेदहा वाजता देवांस लिफ्टमध्ये त्याच्या फ्लॅटमध्ये जात होता.

नक्की वाचा - Nagpur News: 'या' कारणामुळे नागपूर दंगलीचा मुख्य आरोपी फईम खान याचा जामीन अर्ज फेटाळला

त्यानंतर वीज गेली आणि लिफ्ट बंद पडली. देवांस त्यात अडकला. हे ऐकून वडील ऋषिराज घाबरले आणि गार्ड रूमकडे धावले. त्यांनी गार्डला मोठ्याने  "जनरेटर सुरू करा, देवांस लिफ्टमध्ये अडकला आहे, असे सांगितले. याचवेळी   त्याची तब्येत बिघडली आणि तो जमिनीवर पडला. लिफ्ट सुरू झाल्यावर सुमारे तीन मिनिटांनी देवांस बाहेर आला. पण ऋषिराज बेशुद्ध पडला. कुटुंब आणि शेजाऱ्यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

दरम्यान, वडील ऋषिराजचा जनरेटर सुरू करताना  विजेचा धक्का बसला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही शेजाऱ्यांनी केला आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. प्राथमिक तपासामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने  मृत्यू झाल्याचे मानले जात आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Vaishnavi Hagawane Case: हगवणे पिता-पुत्राला थार देणाऱ्या चोंधे फॅमिलीची काळी कुंडली! ब्लॅकमॅजिक, पोरींचा नाद अन् सुनांचा छळ