
सुरज कसबे, पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत असून याप्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार झालेल्या हगवणे पिता पुत्राला आश्रय देणाऱ्या आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. याचप्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली असून फरार राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेंना गाडी पुरवणाऱ्या चोंधे कुटुंबाची हादरवुन टाकणारी काळी कुंडली समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, वैष्णवी हगवणे प्रकरणात फरार राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना सुयश चोंधे आणि संकेत चोंधे यांनी थार गाडी पुरवली होती. या दोन्ही चोंधे कुंटुबाचेही काळेकारनामे समोर आले आहेत. याप्रकरणातील संकेत चोंधे याची दोन लग्ने झाली आहेत तसेच त्याचा भाऊ सुयश चोंधेच्या विरोधात पत्नीला मारहाण केल्याबाबत खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुयश चोंधेची पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींकडून माहेराहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून मारहाण केली जायची. पती सुयश चोंदे याने अश्लील व्हिडिओ दाखवले, शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. तसेच सासू वैशाली चोंधे काळी जादू करायच्या. नवरा बायको वेगळे व्हावेत म्हणून सासूकडून काळ्या जादूचे प्रयोग केले गेले, असे खळबळजनक आरोप धनश्री चोंधेंनी केलेत.
नक्की वाचा - Nagpur News: 'या' कारणामुळे नागपूर दंगलीचा मुख्य आरोपी फईम खान याचा जामीन अर्ज फेटाळला
तसेच बायकोचा छळ व मारहाण केल्याप्रकरणी सुयश चोंधेविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. सुयश चोंधे याच्या पत्नीने महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. याप्रकरणातील पुरावेही दाखवले होते, मात्र याप्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. चोंधे कुटुंबाला काही झळ पोहोचली नाही, असे आरोपही धनश्री चोंधे यांनी केले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world