केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षावर मोठे वक्तव्य केले आहे. शाह यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारत अण्वस्त्र धमकीला घाबरणारा नाही. आम्ही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गुजरातची राजधानी गांधीनगरमधील कार्यक्रमात ते बोलत होते.
अमित शाह यावेळी म्हणाले, भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान घाबरला आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत झालेल्या कारवाईत पाकिस्तानच्या जनतेला कोणतेही नुकसान झालेले नाही. आम्ही पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. आज पाकिस्तान भारताला घाबरतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संपूर्ण जग आश्चर्यचकित
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले, 'सत्ता हाती घेतल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ल्यांना इतके जोरदार प्रत्युत्तर दिले आहे की, जग आश्चर्यचकित झाले आहे आणि पाकिस्तान घाबरला आहे. या वेळी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांची मुख्यालये नष्ट करण्यात आली आहेत.
आम्ही 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते आणि त्यांचे तळ होते. आपल्या सैन्यानेपाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आतपर्यंतचे तळ नष्ट केले.
( नक्की वाचा : PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन? )
अण्वस्त्र धमकीला घाबरणार नाही
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल बोलताना अमित शाह पुढे म्हणाले की, भारत अण्वस्त्र धमकीला घाबरणारा नाही. आम्ही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आज संपूर्ण जग भारताचे कौतुक करत आहे.'ऑपरेशन सिंदूर' हे नाव स्वत: पंतप्रधान मोदी यांनी ठेवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.