पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्र्यांच्या अचानक नाकातून रक्त येऊ लागले; रुग्णालयात दाखल

बंगळुरूमध्ये भाजप-जेडीएस नेत्यांच्या बैठकीनंतर कुमारस्वामी पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषेदत बोलत असताना त्यांचा शर्ट अचानक रक्ताने माखला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

Advertisement
Read Time: 2 mins

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांना नाकातून रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी बंगळुरूमध्ये भाजप-जेडीएस नेत्यांच्या बैठकीनंतर कुमारस्वामी पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषेदत बोलत असताना त्यांचा शर्ट अचानक रक्ताने माखला. कुमारस्वामी यांनी रुमालाने रक्तस्त्राव रोखण्याचा प्रयत्न करताना दिसले. नेमकं हे कशामुळे घडले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुमारस्वामी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्याआधी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र, कुमारस्वामी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भाजप-जेडीएस नेत्यांची बैठक झाली. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) घोटाळ्यासह कर्नाटकातील भ्रष्टाचाराबाबत नेत्यांनी चर्चा केल्याचे विजयेंद्र यांनी सांगितले. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली कर्नाटकात होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत भाजप आणि जेडीएसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. एसटी विकास महामंडळ घोटाळा, मुडा घोटाळा आणि कर्नाटकात होत असलेल्या अनेक घोटाळ्यांमध्ये काँग्रेस सरकारने अनुसूचित जमाती समाजाच्या कल्याणासाठी असलेला पैसा लुटला आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे.

नक्की वाचा -  अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? तो आमदार कोण?

वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात भाजप आणि जेडीएस 3 ऑगस्टला पदयात्रा काढणार आहेत. दोन्ही पक्षांनी 3 ऑगस्टपासून 'पदयात्रा' काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीएस येडियुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी या यात्रेत सहभागी होणार आहेत. पदयात्रा 3 ऑगस्टला सुरू होऊन 10 ऑगस्टला संपणार आहे. पदयात्रेच्या समारोपाला भाजपचे राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहतील. जर सरकारने आमची 'पदयात्रा' थांबवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही थांबणार नाही, असा पवित्रा विरोधी पक्षातील नेत्यांनी घेतला आहे.

Advertisement

नक्की वाचा-  भाजप नेते प्रकाश मेहतांची मोठी घोषणा, बंडखोरी करण्याचे दिले संकेत

Topics mentioned in this article