Ramdas Athawale: '...तर पाकिस्तानसोबत युद्ध करा', केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संताप, काय केलं आवाहन?

Ramdas Athawale On Palagham Terror Attack: जोपर्यंत हा प्रदेश अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहतील..' असंही ते पुढे म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे: 'जर पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरचा भाग देण्यास नकार दिला तर भारताने थेट युद्ध पुकारावे.. असे सर्वात मोठे विधान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केले आहे. जोपर्यंत हा प्रदेश अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहतील..' असंही ते पुढे म्हणाले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले रामदास आठवले?

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी लोणावळा येथे पत्रकारांशी बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला तसेच 22 एप्रिल रोजी प्राण गमावलेल्या 26 जणांना श्रद्धांजलीही अर्पण केली. यावेळी बोलताना त्यांनी भारत- पाकिस्तानच्या युद्धावरुन एक सर्वात महत्त्वाचे विधान केले. 

जोपर्यंत पीओके अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहतील. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की जर पाकिस्तान पीओकेला सोपवत नाही, तर आपण त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारावे," असे आठवले म्हणाले तसेच शेजारी देशाविरुद्ध पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नक्की वाचा - Mumbai News: परफेक्ट नियोजन अन् करेक्ट कार्यक्रम... मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुसाट!

दहशतवादी वारंवार त्याच मार्गाने भारतात प्रवेश करतात. म्हणूनच भारताने पीओके प्रदेशाचा ताबा घेतला पाहिजे." त्यांनी इशारा दिला की पाकिस्तानने हा परिसर रिकामा करावा, अन्यथा भारत युद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाही आणि केंद्र सरकार या प्रकरणाबाबत गंभीर आहे, असा इशारा देत  विरोधी पक्षांनी आमच्यासोबत उभे राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गरज पडल्यास देशासोबत उभे राहायला शिकवले आहे.. असे आवाहनही त्यांनी केले. 

Advertisement

दरम्यान, "कलम 370  रद्द केल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने काश्मीरला भेट देऊ लागले. जम्मू आणि काश्मीर निवडणुकीत मतदानाचे प्रमाण सुमारे 60 टक्के होते. दहशतवादी आणि पाकिस्तान या घडामोडींमुळे खूश नव्हते. भारत अधिक मजबूत होत आहे आणि मुस्लिमांसह जम्मू आणि काश्मीरचे लोक देशासोबत आहेत, असंही रामदास आठवले म्हणाले.