Unique Love Story: दिलदार नवरा! 'ही माझी बायको आजपासून तुझी', पोलीस स्टेशनमध्ये फिल्मी स्टाईल ड्रामा

अहरवाड़ा गावात राहणाऱ्या 31 वर्षीय शशांकचा विवाह 2024 मध्ये सिमरनशी झाला होता.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील शशांक लखेरा या पतीने पत्नी सिमरनला तिच्या प्रियकराच्या स्वाधीन केले आहे
  • सिमरन आणि राज तिवारी यांच्यात लग्नानंतर सहा महिन्यांतच प्रेमसंबंध निर्माण झाले
  • शशांकने पत्नीच्या प्रियकराकडून मारहाण होण्याच्या घटनांमुळे आणि अनर्थ टाळण्यासाठी हा निर्णय घेतला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेजमध्ये अनेकदा तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे संसार मोडल्याच्या घटना आपण ऐकतो. मात्र, मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एका पतीने टोकाचे पाऊल न उचलता चक्क आपल्या पत्नीला तिच्या प्रियकराच्या स्वाधीन केल्याचा धक्कादायक पण तितकाच रंजक प्रकार समोर आला आहे. "तिचे सुख ज्यात आहे, तिथेच ती राहो," असा विचार करत शशांक लखेरा या तरुणाने हा निर्णय घेतला.  जिल्ह्यात 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाची आठवण करून देणारी एक घटना प्रत्यक्षात घडली आहे. एका पतीने आपल्या पत्नीचे प्रेम ओळखून तिला तिच्या प्रियकराच्या स्वाधीन केले आहे. या निर्णयाची सध्या संपूर्ण परिसरात चर्चा रंगली आहे.

अहरवाड़ा गावात राहणाऱ्या 31 वर्षीय शशांकचा विवाह 2024 मध्ये सिमरनशी झाला होता. लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यात सिमरनचे गावातीलच राज तिवारी या तरुणाशी सूत जुळले. शशांक कामावर जात असताना राजचे त्यांच्या घरी येणे-जाणे वाढले. ही बाब जेव्हा शशांकच्या लक्षात आली, तेव्हा घरात मोठे वाद झाले. सिमरनने आत्महत्येची आणि शशांकला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन माहेर गाठले. त्यामुळे शशांक हादरून गेला होता. यातून काही तरी मार्ग काढला पाहीजे असं त्याला वाटत होता. त्यावर तो विचार ही करत होता. पण मार्ग काही सापडत नव्हता. 

Advertisement

नक्की वाचा - Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! 2026 चे शेवटचे 8 महिने 'या' 5 राशींना करणार मालामाल, लागणार बंपर जॅकपॉट

मात्र काही काळानंतर सिमरन परतली. मात्र तिचे राजसोबतचे संबंध सुरूच राहिले. समाज आणि पंचांनी समजावून सांगूनही दोघे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट प्रियकराने शशांकला मारहाण करण्याचा प्रयत्न ही केला. अखेर, रोजच्या कटकटीपेक्षा आणि संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी शशांकने पोलीस ठाण्यात धाव घेत आपली पत्नी कायदेशीररीत्या प्रियकराच्या स्वाधीन केली. तुझं सुख जर राज बरोबर राहण्याच आहे. तर तू त्याच्या सोबत रहा. मी तुझ्या मध्ये येणार नाही. असं सांगत त्याने आपल्याच पत्नीचा हात राजच्या हातात दिला. 

नक्की वाचा - Trending News: 'या' महामार्गावर आता ट्रकला नो एन्ट्री! राज्यातला पहिला हाय-वे, कार- बसचा प्रवास होणार सुसाट

शशांक लखेरा आणि सिमरन यांचा संसार सुरुवातीचे काही महिने सुरळीत चालला. मात्र, राज नावाच्या तरुणाच्या एन्ट्रीने संसारात विसंवाद निर्माण झाला. सिमरन आणि राज तासनतास फोनवर बोलत असत. शशांकने विरोध केला असता सिमरनने थेट पोलिसांत अडकवण्याची धमकी दिली. हा वाद इतका विकोपाला गेला की, सिमरन घर सोडून निघून गेली होती. या पार्श्वभूमीवर अखेर 17 एप्रिल रोजी शशांकने टोकाचा निर्णय घेतला. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला घेऊन केवळारी पोलीस स्टेशन गाठले. तिथे तिघांनीही लेखी अर्ज दिले. "मी माझ्या मर्जीने पत्नीला तिच्या प्रियकराकडे सोपवत आहे, आता आमचा कोणताही संबंध नाही," असे शशांकने अर्जात नमूद केले. तर, राजने सिमरनला पत्नी म्हणून आयुष्यभर जपण्याचे वचन दिले. पतीने दाखवलेल्या या मोठ्या मनामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.