UPSC अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा; कारणही आलं समोर

UPSC chairman Resigned : मनोज सोनी यांनी 28 जून 2017 रोजी केंद्रीय लोकसेना आयोगाचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला होता. 16 मे 2023 रोजी UPSC चेअरमन म्हणून शपथ घेतली आणि त्यांचा कार्यकाळ 15 मे 2029 रोजी संपणार होता.

Advertisement
Read Time: 2 mins

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष मनोज सोनी यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोनी यांचा कार्यकाळ मे 2029 मध्ये संपणार होता. ट्रेनी IAS पूजा खेडकर प्रकरण गाजत असताना मनोज सोनी यांच्या राजीनाम्याने चर्चांणा उधाण आलं आहे. मात्र सोनी यांचा राजीनामा आणि पूजा खेडकर प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यूपीएससीच्या अध्यक्षांनी यापूर्वीच वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता, तो अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज सोनी यांनी 28 जून 2017 रोजी केंद्रीय लोकसेना आयोगाचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला होता. 16 मे 2023 रोजी UPSC चेअरमन म्हणून शपथ घेतली आणि त्यांचा कार्यकाळ 15 मे 2029 रोजी संपणार होता. UPSC चे प्रमुख अध्यक्ष असतात आणि जास्तीत जास्त 10 सदस्य यामध्ये असू शकतात. सध्या UPSC मध्ये सात सदस्य आहेत. 

नक्की वाचा - पूजा खेडकरचं UPSC ने तातडीने निलंबन का केलं नाही?, माजी निवडणूक आयुक्तांचं टीकास्त्र

राजीनाम्याचं कारण काय?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांना UPSC चेअरमन होण्याची बिलकुल इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी या पदावरून मुक्त होण्याची विनंती केली होती. मात्र त्यावेळी त्यांची विनंती मान्य करण्यात आली नाही. सोनी यांना सामाजिक-धार्मिक कामांवर अधिक वेळ घालवायचा आहे.

(नक्की वाचा - पूजा खेडकरांवर UPSC ची सर्वात मोठी कारवाई; गुन्हा दाखल, नोकरीवरही टांगती तलवार)

मनोज सोनी यांची कारकीर्द 

यूपीएससीमध्ये नियुक्तीपूर्वी सोनी यांनी तीन वेळा कुलगुरू म्हणून काम केले होते. 1 ऑगस्ट 2009 ते 31 जुलै 2015 पर्यंत गुजरातच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे (BAOU) कुलगुरू म्हणून सलग दोन वेळा आणि 2005 ते एप्रिल 2008 मध्ये बडोदाच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे (MSU) कुलगुरू म्हणून एक वेळा त्यांनी काम केले.  महाराजा सयाजीराव विद्यापीठात नियुक्तीनंतर सोनी हे भारतातील कोणत्याही विद्यापीठाचे सर्वात तरुण कुलगुरू बनले.

Advertisement
Topics mentioned in this article