- राजस्थान के बाड़मेर की जिलाधिकारी टीना डाबी ने गणतंत्र दिवस पर झंडा फहराने के बाद प्रोटोकॉल में चूक की
- वायरल वीडियो में टीना डाबी झंडा फहराने के बाद गलत दिशा में मुंह करके सलामी देते हुए नजर आईं
- सुरक्षा गार्ड ने टीना डाबी को सही दिशा में मुंह करने का इशारा किया, जिसके बाद वह सही सलामी दीं
Tina Dabi viral video : राजस्थानच्या बाडमेरच्या जिल्हाधिकारी आयएएस टॉपर आणि लातूरच्या सूनबाई टीना डाबी पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत. शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर टीना डाबीने अशी चूक केली जी कधी विसरता येणार नाही. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने बाडमेर जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण करताना टीना डाबी यांनी केलेल्या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर टीना डाबी विरुद्ध दिशेने उभं राहून सलामी देत आहे. टीना डाबी यांनी ध्वजारोहणासाठी दोरी ओढली, मात्र त्याच दिशेने वर पाहून सलामी देण्याऐवजी त्या विरुद्ध दिशेने उभ्या राहिल्या.
टीना डाबी यांच्याकडून कशी झाली चूक?
जिल्ह्याचे प्रमुख आणि युपीएससी टॉपर यांच्याकडून अशा प्रकारे प्रोटोकॉलमध्ये चूक होऊ शकते याचा कोणी विचारही केला नसेल. या घटनेनंतर सोशल मीडियावर टीना डाबी यांना टार्गेट केलं जात आहे. सोशल मीडियावर टीना डाबी यांचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक विविध प्रकारचे सवाल उपस्थित करीत आहेत. टीना डाबी यांच्याकडून याबाबत अद्याप तरी अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.
टीना डाबी यांच्याकडून काय चुकलं?
टीना डाबी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करीत होत्या. ध्वजारोहण केल्यानंतर त्याच्या वागणुकीत वेगळेपणा जाणवत होता. ध्वजारोहण केल्यानंतर त्या गोंधळल्या होत्या. आता पुढे काय करायचं हे त्यांच्या लक्षात आलं नाही, असं व्हायरल व्हिडिओमधून दिसून येत आहे. त्या झेंड्याच्या दिशेने सलामी करण्याऐवजी विरुद्ध दिशेला उभ्या राहतात. यानंतर सुरक्षा रक्षक त्यांना हातांनी इशारा करतो आणि झेंड्याच्या दिशेने उभं राहण्यासाठी खुणावतो. यानंतर त्या झेंड्याच्या समोर उभ्या राहतात.