UP Fire News : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये चप्पल बनवणाऱ्या फक्टरीला भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चप्पल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्यानंतर हे कुटुंब इमारतीच्या चौथ्या माळ्यावर अडकलं होतं. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या चमनगंज परिसरात रविवारी रात्री चार माळ्याच्या इमारतीला भीषण आग लागली होती. या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर चप्पल बनवण्याची फॅक्टरी होती. ज्यामुळे आग काही क्षणात भडकली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)
अग्निशमन दलाच्या जवानांनी काही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं. मात्र काही जण इमारतीतच अडकले. आग प्रचंड असल्याने अडकलेल्या नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांना अडकलेल्या नागरिकांना भाजलेल्या अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही.
(नक्की वाचा- Ajit Pawar:'अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल, पण त्यांनी...' थेट ऑफर कुणी दिली?)
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, आग आधी बेसमेंटला लागली होती. पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. चप्पल फॅक्टरीत असलेल्या प्लास्टिकमुळे आग आणखीच भडकली. अवघ्या 20 मिनिटात आग शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचली. तिथे काही लोक अडकले होते. येथे एकाच कुटुंबातील पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची माहिती मिळत आहे.