उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 30 वर्षांपासून बंद असलेल्या हनुमान मंदिरात शिवलिंग सापडल्याचं समोर आलं आहे. या मंदिरात दशकभरापासून पूजाअर्चा झालेली नाही. प्रशासन आणि पोलिसांच्या वीज चोरी पकडण्याच्या संयुक्त कारवाईदरम्यान या मंदिराबाबत माहिती मिळाली. यानंतर प्रशासन आणि पोलिसांच्या टीमने मंदिराचं दार उघडण्यात आली. मंदिराचं दार उघडताच तेथे ओम नम: शिवाय आणि जय श्रीरामच्या घोषणा सुरू झाल्या.
नक्की वाचा - Worship Act: मंदिर-मशीद वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, केंद्र सरकारला दिले आदेश
समाजवादी पार्टीचे खासदार यांच्या परिसरात 30 वर्षांपासून मंदिर बंद होते. मात्र वीज चोरी संदर्भात पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी मंदिर उघडण्यात आले. त्यावेळी मंदिरात शिवलिंग सापडले. तिथे लगेच मंदिराची साफसफाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मंदिर 1978 मध्ये झालेल्या वादानंतर बंद होता. जे मंदिर आता पोलिसांनी उघडलं आहे. यापूर्वी पुजारी या मंदिरात राहत होते. मात्र दहशतीमुळे मंदिर आणि मोहल्ला सोडून निघून गेले. एका पुजारीने दिलेल्या माहितीनुसार, या मंदिरात पूजा-पाठ आणि आरती करण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. त्यामुळे पुजाऱ्यांनी आपलं घर विकले आणि मंदिराला टाळं ठोकून तिथून निघून गेले. आज विजेच्या तपासणीदरम्यान प्रशासनाचं लक्ष या मंदिरावर पडलं. यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याला बोलावून तपासणी करण्यात आली. त्यानंतर मंदिराची कपाटं उघडण्यात आली.