उत्तराखंड कॅडरच्या 2015 बॅचच्या आयपीएस रचिता जुयाल यांनी यांनी आपल्या पदावरुन राजीनामा दिला आहे. आयएएस किंवा आयपीएस होणं हे अनेक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं. रचिता यांचं ते स्वप्न पूर्ण झालं. मात्र नोकरीच्या दहा वर्षात त्यांनी नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र अद्याप त्यांच्या राजीनाम्यांवर अंतिम निर्णय घेतलेला नाही. यानंतर आयपीएस रचित जुयाल यांची फाइल भारत सरकारला पाठवण्यात येईल.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या 10 वर्षात आयपीएस रचिता जुयाल यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर आपली जबाबदारी पार पाडली आहे. आयपीएस रचिता जुयाल त्यांच्या लव्ह स्टोरीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. रचितने चित्रपट दिग्दर्शक यशस्वी जुयालसोबत लग्न केलं आहे. यशस्वी हा डान्सर राघव जुयालचा भाऊ आहे. रचिता आणि यशस्वीची लव्ह स्टोरी कोविडमध्ये सुरू झाली होती. यशस्वीने कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठी समाजसेवा केली होती. ज्यामुळे रचिता खूप प्रभावित झाली.
नक्की वाचा - India GDP Growth Rate : कृषी आणि सेवा क्षेत्राची चांगली कामगिरी, चौथ्या तिमाहीत GDP 7.4 टक्क्यांवर
2015 मध्ये रचिता जुयालने यूपीएससी परीक्षेत 215 वा क्रमांक मिळवला आणि त्यानंतर तिने अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. आयपीएस रचिता जुयाल या अल्मोडा आणि बागेश्वर जिल्ह्यांच्या एसपी होत्या, तर यापूर्वी त्या राज्यपालांच्या एडीसी म्हणूनही कार्यरत होत्या. 2020 मध्ये, माजी राज्यपाल देवी राणी मौर्य यांनी त्यांना त्यांचे एडीसी म्हणून नियुक्त केले. केवळ 10 वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी पोलीस अधिकारी पदाचा राजीनामा दिल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.