Uttarakhand Crime: कौटुंबिक कलह आणि पती पत्नीमधील क्षुल्लक वाद कोणत्या थराला जाऊ शकेल हे काही सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना उत्तराखंडमधून समोर आली आहे. उत्तराखंडमधील एका बेरोजगार तरुणाने दोन पत्नींमधील वादाला कंटाळून स्वतःच्याच मृत्यूचा खोटा बनाव रचला, तब्बल १९ दिवस पोलिसांनी शोध घेतल्यानंतर तो दिल्लीमध्ये सापडला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील एका तरुणाने दोन पत्नींमधील वाद आणि बेरोजगारीला कंटाळून स्वतःच्या मृत्यूचा खोटा बनाव रचला. तब्बल १९ दिवस उत्तराखंड पोलीस ज्याचा शोध घेत होते, तो तरुण अखेर दिल्लीत जिवंत सापडला आहे. मनोज कुमार असे या व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
Shocking! पोटदुखीने त्रस्त तरुण डॉक्टरकडे गेला, पोटात दिसलं असं साहित्य, तब्बल 9 ब्रश अन्...
मनोज कुमार हा दक्षिण दिल्लीतील रहिवासी असून तो सध्या राणीखेत येथे त्याच्या दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता, जी व्यवसायाने शिक्षिका आहे. ८ डिसेंबर रोजी मनोज एका कामासाठी बाहेर पडला आणि बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी पत्नीने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान त्याची स्कूटी बागेश्वर येथील एका खोल दरीत सापडली.
दिल्लीत जिवंत सापडला तरुण...
परिस्थिती पाहता पोलिसांनी हा अपघाताचा किंवा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा प्रकार असावा, असा अंदाज बांधला होता. मात्र, तांत्रिक तपासात मनोजचे लोकेशन दिल्लीत आढळल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. अखेर १९ दिवसांपासून पोलीस ज्याचा शोध घेत होते, ज्याचा मृत्यू झाला असे समजत होते तो मात्र दिल्लीमध्ये सापडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोजने २०१९ मध्ये दुसरे लग्न केले होते. त्याच्या दोन्ही पत्नींना एकमेकींच्या अस्तित्वाबद्दल माहिती नव्हती. दुसऱ्या पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने अपघाताचे नाटक रचले आणि दिल्लीत जाऊन लपून राहिला. आता पोलीस या तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी करत आहेत.
Virar Crime: सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त! पती, नणंदेकडून विवाहितेची हत्या; धक्कादायक कारण समोर