स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री उपस्थित असणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची ही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ही महत्त्वाचे बैठक पार पडणार आहे.
राज ठाकरेंबरोबरच्या युतीबाबत आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य
आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. आमची भावना हीच आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या हितासाठी जर कोणी सोबत येण्यासाठी तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन, अस स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. डोंबिवलीत आमचे दीपेश म्हात्रे आणि राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केलेला आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे असं ही आदित्य म्हणाले.
16 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या 2 महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात
16 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या 2 महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील घटना, जमिनीचा अर्धा हिस्सा नावावर करण्यासाठी स्वीकारत होत्या लाच, आरोपी तलाठी भाग्यश्री तेलंगे, सुजाता गवळे जेरबंद, किनवट पोलिस स्थानकांत गुन्हा नोंद,
ST कर्मचाऱ्यांना जूनपासून 53 टक्के महागाई भत्ता, एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यातील राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुळ वेतनावर जून 2025 पासून 46 टक्के ऐवजी 53 टक्के महागाई भत्ता अदा करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. महामंडळातील कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यापैकी एक निवडण्याचा पर्याय, एक कोटी रुपयांचे अपघाती विमा कवच लागू करण्याचा तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पास नऊ ऐवजी 12 महिन्यासाठी देण्याचा निर्णयही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
म्हाडाच्या 96 अतिधोकादायक इमारतींतील रहिवाश्यांना दरमहा 20 हजार भाडे देण्याचा निर्णय
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील ९६ अतिधोकादायक इमारतींमधील भाडेकरू/रहिवाश्यांनी त्यांच्या स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास मंडळामार्फत दरमहा २० हजार रुपये भाडे अदा करण्याचा निर्णय 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी नुकताच जाहीर केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोनाची एण्ट्री
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 10 वर
महापालिका हद्दीतील 8 आणि ग्रामीण भागातील 2 रुग्णाचा समावेश आहे
छत्रपती संभाजीनगर शहरात सोमवारी महापालिकेकडून दिवसभरात 42 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, मनपा मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनासंदर्भातील विविध खबरदारीच्या सूचना
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल
रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल
शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांचे गंभीर आरोप
महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मीक कराड
महेंद्र थोरवे यांच्या कथित दादागिरी आणि गुंडगिरीचा वाचला पाढा
राष्ट्रवादीकडून कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेऊन थोरवेंवर शाब्दिक हल्ला
दोन दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केली होती जोरदार टीका.
JCB फसवणूक केल्याप्रकरणी हगवणे माय-लेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी
JCB फसवणूक केल्याप्रकरणी हगवणे माय-लेकाला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एकाला जेसीबी विकून त्यांनी तो परत आपल्या ताब्यात घेतला होता. शिवाय संबधिताचे पैसे ही परत करण्यास नकार दिला होता. त्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यात त्यांना आत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Live Update : कराडच्या सुटकेवर 17 जूनला युक्तिवाद, उज्ज्वल निकमांचा पुराव्यांवर भरोसा
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा 50 मिनटं युक्तिवाद झाला. देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला. तर वाल्मीक कराडच्या वकीला कडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं. तर वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज न्यायालयात प्रस्तावित केला आहे. या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे.
Live Update : कल्याण मधील धक्कादायक घटना, परदेशात नोकरीच्या नावाखाली तरुणांची लाखोंची फसवणूक
कल्याण मधील धक्कादायक घटना, परदेशात नोकरीच्या नावाखाली तरुणांची लाखोंची फसवणूक
स्काय सिकर टुरिझम या कंपनीने केली फसवणूक
पैसे आणि पासपोर्ट घेऊन कंपनी पसार
बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Live Update : आषाढीच्या तोंडावर मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम अपूर्ण...
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम केवळ 40 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित 60 टक्के जतन आणि संवर्धनाचे काम अद्याप अपूर्णच असल्याचे दिसून येते. आषाढी वारीच्या तोंडावर मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. मात्र हे काम अपूर्णच राहिले आहे. 73 कोटी रुपयांचा मंदिर जतन आणि संवर्धनाचा आराखडा तयार करण्यात आला होता. गेल्या 14 महिन्यापासून मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला सुरुवात झाली. यासाठी गतवर्षी विठ्ठलाचे गर्भगृह दीड महिन्यासाठी बंदही ठेवण्यात आले होते. या घटनेलाही एक वर्ष उलटले. तरी अद्यापही जतन आणि संवर्धनाचे काम पूर्ण झाले नाही. अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायातून आणि विठ्ठल भक्तातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Live Update : कौटुंबिक सरंक्षण कायद्यावर जूनच्या शेवटी बैठक
कौटुंबिक सरंक्षण कायद्यावर जूनच्या शेवटी बैठक
विधानपरिषदेच्या उपसभापती घेणार बैठक
बैठकीला महिला आयोग बाल हक्क आयोग तसेच अनेक महिला नेतृत्व यांची उपस्थिती असणार
कौटुंबिक सरंक्षण कायद्यात काहो बदल करता येतील का त्याला अधिक कडक कठोर कसे बनवता येतील यावर चर्चा
Live Update : माळशिरस नवा कोरोना रुग्ण, आषाढीच्या तोंडावर कोरोनाचं संकट
आषाढीच्या सोहळ्यासाठी गजानन महाराज मुक्ताई यांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. अशातच पालखी मार्गावर असणाऱ्या माळशिरस मध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. माळशिरसच्या वेळापूर मध्ये कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला आहे. माळशिरस तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या आता चार वर जाऊन पोहोचली. पालख्यांचा सर्वाधिक मुक्काम माळशिरस तालुक्यात समजला जातो. याच माळशिरस तालुक्यात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने प्रशासन सतर्क झाला आहे. कधी या निमित्ताने आषाढी वर कोरोनाचे संकट येऊन उभे टाकले आहे. नागरिकांसह भाविकांनीही आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आता जिल्हा प्रशासनाकडून होत आहे.
Live Update : वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट, राजेंद्र आणि सुशील हरवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
राजेंद्र हगवणे, सुशील हरवणे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
Live Update : राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण शिवाजीनगर न्यायालयात हजर, सुनावणीला सुरुवात
Live Update : राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण शिवाजीनगर न्यायालयात हजर, सुनावणीला सुरुवात
Live Update : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी संदर्भात अधिसूचना नाही
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अद्यापपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकी संदर्भात निवडणूक आयोगाकडून अधिसूचना नाही…
स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकासंदर्भात न्यायालयाने ६ मे च्या आदेशात २८ दिवसांत अधिसूचना जाहीर करा असे निर्देश दिले होते…
६ मे च्या आदेशाचा विचार करता २ जूनलाच २८ दिवस पूर्ण
जर 1 महिना असा विचार केला तर अंतिम मुदत ५ जूनला पूर्ण होते
त्यामुळं या आठवड्यात अधिसूचना अपेक्षित
अधिसूचना न आल्यास आयोगाला मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टात अर्ज करावा लागेल
सर्वोच्च न्यायालय सुट्टीत असली तरी… 24 मे ते 13 जुलैदरम्यान 5 खंडपीठे अंशतः कार्यरत
या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता!
Live Update : सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी 4 जूनपर्यंत बंद
सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी ४ जून पर्यंत बंद
सिंहगड किल्ल्यावर अनधिकृत बंदकाम हटवण्याचे काम २९ मे पासून चालू असून सध्या आरसीसी संरचना हटवण्याचे काम चालू आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवस म्हणजे ४ जून पर्यंत या कारणांमुळे सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद राहील
Live Update : मुंबईच्या नरीमन भवनमधील BEST मीटर बॉक्सला आग!
मुंबईच्या नरीमन भवनमधील BEST मीटर बॉक्सला आग!
सकाळी 8.30 वाजता अचानक लागली आग
परिसरात धुराचे लोढे, नागरिकांमध्ये घबराट
अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही
नरीमन पॉईंट परिसरात तात्पुरती गर्दी व वाहतूक अडथळा
Live Update : परभणीत चार लाख रुपयांचा अवैध गुठखा जप्त, आरोपी अटकेत!
गंगाखेड पोलिसांनी कोदरी रोडवर अवैध गुटख्याची वाहतूक करत असलेल्या ओमनी कार आणि एका आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चार लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, कारचालक रतन मोठे हा अकोले येथील राहणार असून प्रतिबंधित असलेला गुटखा आणि पान मसाल्याची चोरट्या मार्गाने ते वाहतूक करत असल्याची माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतली असून त्याच्याकडून अवैध गुटखा आणि वाहन जप्त करण्यात आले आहे...
Live Update : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इथं अपघात, एकाचा मृत्यू तिघे जखमी
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव इथं पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर तिघे जण जखमी झाले. जखमींमध्ये 2 लहान मुलींचा समावेश आहे. त्यांच्यावर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुने माणगाव इथं पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून महाड कडे जाणाऱ्या बसने रिक्षाला धडक दिली. यात चौघे जखमी झाले. यातील अशोक सोनार यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
Live Update : ठाण्यात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी...
सकाळपासूनच मुंबई ठाणे आणि आजूबाजू परिसरामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे...3 जून 2025 रोजी राज्यातील हावमानाचा अंदाज वर्तवला आहे हवामान खात्याने राज्यातील काही भागांना येलो अलर्ट जारी केला होता.पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जर अती महत्वाचा काम असेल तरच घराबाहेर पडा अशी महत्त्वाची सूचना हवामान विभागाने दिलेली आहे...मुंबईत पुढील ३ ते ४ तास पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने वर्तवली आहे...
Live Update : पुण्यात तिकीट दरवाढ केल्यानंतर पीएमपीच्या उत्पादनात मोठी वाढ
तिकीट दरवाढ केल्यानंतर पीएमपीच्या उत्पादनात मोठे वाढ
रविवारी एकाच दिवसात 55 लाखांचे अतिरिक्त उत्पन्न
महत्त्वाचा म्हणजे रविवारी नियोजनापेक्षा 1000 बस रस्त्यांवर धावत नसतानाही उत्पन्न वाढले
रविवारी 1554 बसमधून नऊ लाख 45 हजार 971 प्रवाशांनी केला प्रवास
त्यामुळे पीएमपीला दिवसभरात एक कोटी 97 लाख 17 हजार रुपयांचा महसूल मिळाला...
पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात पीएमपी कडून तिकीट दरवाढ करण्यात आली आहे
Live Update : कांदा नुकसानीमुळे दर वाढण्याची शक्यता नाही..
अवकाळी व मान्सूनपूर्व पावसाने कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे शेतातील व शेतात काढून ठेवलेला 20 टक्के कांद्याचे नुकसान झाले आहे.मात्र यंदा कांद्याचे 120 टक्के इतके बंपर उत्पादन झाले आहे.त्यामुळे भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे दर वाढतील अशी कुठलीही शक्यता नाही तरी केंद्र सरकारने घाई गर्दीमध्ये शेतकरी विरोधी कुठलाही निर्णय घेऊ नये तसेच शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावा त्यामुळे कांद्याचे बाजार भाव स्थिर राहण्यासाठी मदत होईल असे आवाहन नाशिकच्या लासलगावातील कांदा तज्ञ जयदत्त होळकर यांनी केले
Live Update : विद्यार्थ्यांना देणार सैनिकी शिक्षण, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती
राज्यातील पहिली ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता सैनिकी शिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.शालेय शिक्षण व माजी सैनिक कल्याण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यातील अडीच लाख माजी सैनिकांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे.महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ही शिक्षण देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले.
Live Update : अकोला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीची धडक
अकोल्याच्या जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय मधे वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांना भेटून जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून लूट असलेली शेतकऱ्यांची त्वरित थांबवावी अशी मागणी केली.. दरम्यान जिल्ह्यामध्ये शेती पेरणी सुरू झाली असून अजित 5 आणि अजित 55 बियाणे DAP आणि युरिया या खताचा प्रचंड तुटवडा वाढत आहे. याचक कारण काही व्यापाऱ्यांनी जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला असून काही व्यापारी बियाणे व खते चोरून जास्त दराने विक्री करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे..