गंगेच्या पात्रात रंगली इफ्तार पार्टी; बिर्याणी खाल्ली अन्... मुस्लीम तरुणांच्या कृत्याने खळबळ, 14 जणांना अटक

वाराणसीच्या गंगा नदी पात्रातील एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
varanasi iftar party video ganga river
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • वाराणसी में गंगा नदी के बीचों बीच मुस्लिम समुदाय के लोगों ने इफ्तार पार्टी आयोजित की थी
  • इफ्तार पार्टी में बिरयानी खाने के बाद मांस की हड्डियां गंगा नदी में फेंकी गईं थीं
  • सोशल मीडिया पर वीडियो वायरल होने के बाद इस मामले ने विवाद और आलोचना को जन्म दिया
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
वाराणसी:

Varanasi News : वाराणसीच्या गंगा नदीच्या पात्रातील एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. गंगेच्या पात्रात एका बोटीवर इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोटीत या मुस्लीम तरुणांनी बिर्याणी खाल्ली आणि उरलेली हाडं गंगा नदीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या मुस्लीम तरुणांच्या अडचणी वाढल्या आहे. या प्रकरणात १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. यादरम्यान वाराणसीतील एका व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे. येथे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुस्लीम समाजातील काही तरुणांनी गंगा नदीमध्ये बोटीत इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं. हा व्हिडिओ समोर येताच खळबळ उडाली. गंगा नदीमध्ये इफ्तारचं आयोजन केलेल्या तरुणांनी केवळ बिर्याणीच खाल्ली आणि हाडं नदीत फेकून दिली.

Advertisement

नक्की वाचा - Pune News : दिवसभराचा रोजा, तलावाजवळ इफ्तारीची तयारी; 50 जणं दुचाकीवरुन आले अन् पुण्यात तरुणांसोबत भयंकर घडलं 

पोलिसांनी १४ जणांना घेतलं ताब्यात....

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी एकूण १४ जणांना अटक करीत तपास सुरू केला आहे. सर्व १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

Topics mentioned in this article