- अरुण कुमार हा तेलंगणाचा तरुण आहे जो गरीब परिस्थितीतून उठून सोशल मीडिया स्टार झाला
- त्याने इयत्ता चौथीनंतर शिक्षण सोडले आणि ट्रकवर क्लीनर म्हणून काम केले होते
- ट्रक ड्रायव्हर नेहरू यांनी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून त्याला शिक्षणासाठी मदत केली
Viral Laughing Boy Arun Kumar: सोशल मीडियावरील एका रीलने एखाद्याचे आयुष्य कसे बदलू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे तेलंगणाचा अरुण कुमार. 'व्हायरल लाफिंग बॉय' म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेला अरुण कधीकाळी अत्यंत गरिबीत दिवस काढत होता. घरच्या परिस्थितीमुळे इयत्ता चौथीनंतरच त्याचे शिक्षण सुटले. त्यानंतर त्याला ट्रकमध्ये क्लीनर म्हणून काम करावे लागले. मात्र, एका व्हायरल व्हिडिओने त्याला केवळ प्रसिद्धीच मिळवून दिली नाही, तर पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहातही आणले. तो शिकला ही आणि रिल स्टार म्हणून टिकला ही असचं म्हणावं लागले. त्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
अरुणच्या प्रवासात ट्रक चालक नेहरू यांची भूमिका मोलाची ठरली. चहा पिताना अरुणच्या निखळ हास्याचा व्हिडिओ नेहरू यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. तो रातोरात जबरदस्त व्हायरल झाला. केवळ व्हिडिओ बनवून न थांबता, नेहरू यांनी अरुणला पुन्हा शाळेत प्रवेश मिळवून दिला. अरुणनेही जिद्दीने अभ्यास करून 10 वीची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. आज अरुण एक यशस्वी कंटेंट क्रिएटर म्हणून ओळखला जातो. त्याला फॉलो करणारे अनेक जण आहे. त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.
अरुण ज्या ट्रकमध्ये काम करायचा, त्याच ट्रकचे ड्रायव्हर नेहरू यांनी त्याचा तो व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की जगभरात अरुणच्या हास्याचे मीम्स बनू लागले. प्रसिद्धी मिळाल्यावर अरुणने मजुरी सोडली आणि नेहरू यांच्या मदतीने पुन्हा अभ्यास सुरू केला. नुकताच तो 10 वी पास झाला असून, त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे आज लाखो फॉलोअर्स असून तो आपल्या यशाचे श्रेय नेहरू यांना देतो.
प्रवासातील महत्त्वाचे टप्पे:
- संघर्ष: गरिबीमुळे 4 थीनंतर शाळा सुटली, ट्रक क्लीनर म्हणून कामाला सुरुवात.
- महत्वाचा पॉईंट: चहा पिताना हसतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल.
- मदत: ट्रक ड्रायव्हर नेहरू यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि शाळेत प्रवेश मिळवून दिला.
- सध्याची स्थिती: यशस्वी कंटेंट क्रिएटर आणि 10 वी उत्तीर्ण.
अरुण कुमार आता स्वतःचे यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज चालवतो. जिथे त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये आहे.