जाहिरात

Ajit Pawar: दादांच्या विमान अपघाताबाबत CID च्या हाती काय लागलं? 'या' 3 गोष्टी निर्णायक ठरणार

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की अनेक संस्था या तपासात सहभागी आहेत. या संस्थांचा अहवाल देखील सी आय डी च्या तपासात समाविष्ट करण्यात येणार आहे.

Ajit Pawar: दादांच्या विमान अपघाताबाबत CID च्या हाती काय लागलं? 'या' 3 गोष्टी निर्णायक ठरणार
  • अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून तीन मुख्य बाबींवर लक्ष केंद्रीत आहे
  • सीआयडी तपासात आकस्मिक मृत्यूमागे घातपात, क्रिमिनल निग्लीजन्स आणि गुन्हेगारी कट यांचा समावेश आहे
  • तपासासाठी फॉरेन्सिक लॅब, एव्हिएशन एजन्सीज आणि केंद्रातील विविध संस्थांचा सहकार्य घेतले जात आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

सुरज कसबे 

Ajit Pawar plane crash: अजित पवारांच्या विमान अपघाताचे गुढ आणखी वाढत चालले आहे. एकीकडे रोहित पवार यांनी हा अपघात नाही तर घातपात आहे असा दावा केला आहे. शिवाय DGCA विरोधात एफआयआर दाखल करण्याचाही त्यांचा आग्रहा आहे. सीबीआय चौकशीची मागणी ही केली गेली आहे. त्यात या अपघाताचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी पत्रकार परिषद घेवून तपासाबाबत महत्वाची माहिती दिली. शिवाय आपल्या हाती काय लागले आहे, कोणत्या गोष्टींवर आम्ही तपास पुढे नेत आहे याची सविस्तर माहिती दिली. 

अजित पवारा यांच्या विमानाचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला होता. विमानाच्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार आणि इतर व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार तीन गोष्टींवर सीआयडीने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात पहीला भाग हा आहे की या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का हा देखील तपासाचा भाग आहे असं यावेळी रामानंद यांनी स्पष्ट केले. दुसरा भाग म्हणजे क्रिमिनल निग्लीजन्स आहे का याचा देखील तपास होतो आहे. तर तिसरा भाग म्हणजे हा गुन्हेगारी कट आहे का या अंगाने देखील तपास होतो आहे असं रामानंद यांनी स्पष्ट केले आहे. 

नक्की वाचा - Ajit Pawar Plane Crash: रोहित पवारांच्या लढ्याला मोठं यश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की अनेक संस्था या तपासात सहभागी आहेत. या संस्थांचा अहवाल देखील सी आय डी च्या तपासात समाविष्ट करण्यात येणार आहे. या अपघाताचा तपास सी बी आय कडे देण्यासाठी देखील पत्र देण्यात आले आहे. मात्र  असं असलं तरी सीआयडीचा तपास योग्य दिशेने आणि वेगाने चालला असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. VSR कंपनीवर DGCA कडून कारवाई झालीय, तुमच्या तपासात या कंपनीकडून हलगर्जीपणा आढळून आलाय का ? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की तांत्रिक तपास हा वेगळा भाग आहे. आमचा CID चा तपास हा आकस्मिक मृत्यू बद्दल आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं.  

नक्की वाचा - Rohit Pawar: बारामतीमध्येही रोहित पवारांची निराशा! दीड तास चर्चा, पोलिसांवर कागदपत्रे फेकली, नेमकं काय घडलं?

सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या तपासात काही पुरावे मिळाले आहेत असं ही ते म्हणाले. AAIB चा अहवाल आला की तो आमच्या तपासात समाविष्ट केला जाईल. सध्याच्या स्थितीत सीआयडीचा तपास हा योग्य दिशेने होत आहे. आम्ही प्रोफेश्नल पद्धतीने तपास करत आहोत. त्यासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंट, फॉरेन्सिक सायन्स लॅब, एव्हिएशन एजन्सीज यांची मदत घेतली जात असल्याचं ही त्यांनी सांगितलं. या तपासात केंद्रातील अनेक संस्था आहे. त्यांचे ही आम्ही सहकार्य घेणार असल्याचं ते म्हणाले. यात जर कोणते ही गुन्हेगारी कृत्य आहे हे निष्पन्न झाल्यास सीआयडी योग्य कलमांखाली गुन्हा दाखल करुन उर्वरित तपास करुन न्यायालयात जाईल असं ही ते म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com