Samrat Dhaba Sealed: प्रसिद्धी ढाब्यावर ग्राहकाला दह्यामध्ये उंदीर आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आणि प्रशासनाने तत्काळ कारवाई करत ढाब्याला टाळं ठोकलंय. उत्तर प्रदेशातील गाझीपूर शहरातील ही घटना आहे. गाझीपूर-वाराणसी हायवे परिसरात असलेल्या प्रसिद्ध सम्राट ढाब्याविरोधात (Samrat Dhaba) प्रशासनाने मोठी कारवाई केलीय.
नेमके काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी गाझीपूर-वाराणसी हायवे परिसरातील सम्राट ढाब्यावर काही ग्राहक पोहोचले होते. यावेळेस दह्याचे ऑर्डर दिले असता प्लेटमध्ये मेलेला उंदीर पाहून त्याना धक्काच बसला. ग्राहकांनी लगेचच दह्यात पडलेल्या उंदराचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला.
व्हिडीओ होतोय व्हायरल
दह्यात पडलेल्या मेलेल्या उंदराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय की, दह्याच्या ताटात मधोमध एक मेलेला उंदीर दिसतोय. स्थानिकांसह हायवेवरुन प्रवास करणाऱ्या लोकांनी या घटनेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
प्रशासनाने ढाब्याला ठोकलं टाळं
व्हायरल व्हिडीओ तसेच तक्रारीनुसार अन्न आणि औषध प्रशासनाने (FSDA) ढाब्याविरोधात तत्काळ कारवाई केली. गुरुवारी अधिकाऱ्यांच्या टीमने ढाब्याविरोधात छापेमारीची कारवाई केली. दुर्गंध आणि निष्काळजीपणाचे ठोस पुरावे मिळाल्यानंतर प्रशासनाने सम्राट ढाब्याला टाळं ठोकलंय. खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेतही पाठवण्यात आले आहेत.
(नक्की वाचा: Trending News : आधी ओढणीने गळा आवळला, मग केले शरीराचे तुकडे; एका फोन कॉलने मालकिणीला मृत्यूच्या सापळ्यात ओढलं!)
FIR दाखल झालेला नाही
लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही संस्थेला सोडले जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. गाझीपूर कोतवालीचे पोलीस निरीक्षक महेंद्र सिंह यांनी ढाब्यावर करण्यात आलेल्या तपास कारवाईबाबत पुष्टी दिलीय. पण या संदर्भात कोणताही एफआयआर दाखल झालेला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
(नक्की वाचा: Video: पतीने स्कूटरमध्ये लावलेल्या GPS ट्रॅकरमुळे पत्नीचं कांड आलं समोर! एका क्षणात 15 वर्षांचा संसार मोडला)
हायवेवर प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ?गाझीपूर-वाराणसी हायवे परिसरात असणाऱ्या या ढाब्यावर दरदिवशी शेकडो प्रवासी जेवणासाठी येतात. सम्राट ढाबा गाझीपूरमधील सर्वात जुने आणि प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. अशातच ढाब्याच्या स्वच्छतेबाबत अशा प्रकारचा निष्काळजीपणा समोर आल्यानं जिल्ह्यातील अन्य हॉटेल आणि ढाब्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले जातंय.