Viral Video: 9 वर्ष मॅनेजर, IT मध्ये अलिशान नोकरी, पण आता चालवते रिक्षा, महिन्याची कमाई ऐकून थक्क व्हाल

त्यामुळे आजची पिढी मानसिक आरोग्याला पैशांपेक्षा जास्त महत्त्व देत असल्याचेच यातून अधोरेखित होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

मोठ्या आयटी कंपन्यांमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि त्यासोबत येणारा मानसिक ताण हा सध्या चिंतेचा विषय बनत आहे. आयटी क्षेत्रात काम मिळालं की करिअर झालं असाच सर्वांचा मानस होता. पण आता अनेक तरुणांना हे क्षेत्र  नकोसे वाटू लागले आहे. याच मानसिक ताणाला कंटाळून एका महिला आयटी इंजिनियरने चक्क नोकरी सोडली. विशेष म्हणजे तीने जवळपास नऊ वर्षे या कंपनीत मॅनेजर म्हणून काम केले. आता तिने नोकरी सोडून तिने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय त्यावर कमेंटचा ही पाऊस पडत आहे. 

​हा व्हिडिओ dr.nezrin_midhlaj या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. संबंधित महिलेने आयटी क्षेत्रात तब्बल 9 वर्षे मॅनेजर म्हणून काम केले होते. मात्र, सततचे डेडलाईन्स आणि कामाच्या दडपणामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर गंभीर परिणाम होत होता. पैसे मिळत होते पण जिवाला शांती नव्हती. आराम नव्हता. होतं ते फक्त आणि फक्त टेन्शन. अखेर या तणावातून मुक्त होण्यासाठी तिने कॉर्पोरेट जगताला कायमचा रामराम ठोकला. आता ती रिक्षा चालवते. शिवाय महिन्याला जवळपास 60000 रुपये कमावत आहे. हे करत असताना तिला कोणताही मानसिक ताण नाही. किंवा बॉसची कटकट नाही असं ही ती सांगते. 

Advertisement

नक्की वाचा - Shocking news: केंद्रीय राज्यमंत्रीपदाचे आमिष! 20 कोटी 50 लाखांची मागणी, टोकन म्हणून 1 कोटी, भाजपच्या...

​"आता डोक्यावर कोणत्याही बॉसचे दडपण नाही आणि मी माझ्या अटींवर जगतेय," असे तिने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. शिवाय मी माझे नवे काम खूप एन्जॉय करते असं ही तिने म्हटले आहे. या व्हिडिओला 2 लाख 64 हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. काही नेटकऱ्यांच्या मते, या महिलेने आधी मोठी बचत केली असेल आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला असेल. तर काहींनी आयटी क्षेत्रातील आपल्या 18 वर्षांच्या अनुभवाचा दाखला दिला आहे. आजही तिथला ताण कमी झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. 

नक्की वाचा - Munna zingada : मुन्ना झिंगाडा! डी कंपनीचा चरसी अन् दहशतवाद्यांचा हँडलर, जाणून घ्या झिंगाडाचा खतरनाक प्रवास

काहीने या तरुणीच्या धाडसाचे कौतूक केले आहे. असा निर्णय घ्यायला हिंमत लागते असं ही सांगण्यात आलं आहे.  ही महिला केरळी असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे. शिवाय ती बोलताना ही प्रसन्न वाटत आहे. पहीले नोकरी करताना ताण होता. आता तो ताण नाही. माझी मिच बॉस आहे. जे पैसे रिक्षा चालवून मिळतात त्यात आपण समाधानी असल्याचं ती या व्हिडीतून सांगत आहे. त्यामुळे आजची पिढी मानसिक आरोग्याला पैशांपेक्षा जास्त महत्त्व देत असल्याचेच यातून अधोरेखित होते.