Shocking news: सरकारी शाळेत बार बालांचा अश्लील डान्स!रात्रीच्या अंधारात लावले ठुमके, Video Viral

या व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. त्यावरून तरी काही कारवाई होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर येथील सरकारी शाळेच्या मैदानावर रात्री बार बालांचा अश्लील डान्स
  • शाळेच्या नावावर वर्तमानपत्राचे कागद चिकटवून कार्यक्रमाचे ठिकाण लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता
  • शाळेचे साहाय्यक शिक्षकांनी शाळेच्या गेटचे कुलूप तोडल्याची कबुली दिली असून अद्याप पोलीस तक्रार दाखल झालेली नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

ज्या शाळेत मुलांनी विद्यार्जन करायला हवे, तिथे रात्रीच्या वेळी अश्लील गाण्यांवर बार बालांच्या नृत्याचा कार्यक्रम रंगल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधाराच चक्क शाळेच्या मैदानात बार बालांना नाचवण्यात आले. त्यांचा या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे यावर सगळ्याच स्तरातून टिकेची झोड उठत आहे.   बिहारच्या वैशाली जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. हाजीपूर इथल्या सरकारी शाळेत हा प्रकार घडला. या प्रकारामुळे बिहारच्या शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

विशेष म्हणजे, हा अश्लील कार्यक्रम सुरू असताना शाळेची ओळख पटू नये म्हणून शाळेच्या नावावर वर्तमानपत्राचे कागद चिकटवण्यात आले.  त्यातून हे नाव झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिक्षण समितीचे अध्यक्ष मलाई सिंह यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त वऱ्हाड्यांच्या मनोरंजनासाठी चक्क शाळा परिसराचाच वापर करण्यात आला. शाळेचे कुलूप तोडून हा कार्यक्रम पार पडल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. अद्याप याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. मात्र शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

नक्की वाचा - CIDCO News: सिडकोच्या 'माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये' योजनेत पर्याय निवडीसाठी मुदतवाढ

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे मुख्य गेट तोडून हा कार्यक्रम करण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा प्रकार कोणाला समजू नये म्हणून शाळेच्या फलकावर वर्तमानपत्र चिकटवण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. पोलिसांनी सांगितले की, जोपर्यंत लेखी तक्रार येत नाही, तोपर्यंत कारवाई करता येणार नाही. मात्र, या व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. त्यावरून तरी काही कारवाई होणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

नक्की वाचा - Bank Holidays 2026: उद्यापासून बँकाना किती दिवस सुट्टी? पाहा RBI ची बँक हॉलिडे लिस्ट

या प्रकरणातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे शाळेच्या साहाय्यक शिक्षकांनी अध्यक्ष मलाई सिंह यांनी गेटचे कुलूप तोडल्याचे मान्य केले आहे. पण तरीही अद्याप कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (DEO) या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले असून, आता तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. शाळेचे नाव लपवून अशा प्रकारे अश्लील कार्यक्रम करणे, हे शिक्षण क्षेत्रासाठी लांछनास्पद असल्याची टीका होत आहे.

Advertisement

नक्की वाचा - Navi Mumbai: भामटा एक महिला अनेक! मेट्रोमोनीयल साईटवर भयंकर कांड, शरिरसंबंध, पैशांची लूट अन् बरचं काही