Seema Sachin will soon surprise people: पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर आणि तिचा पती सचिन मीणा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ते चाहत्यांना एक मोठी खुशखबर देणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत हे 'सरप्राईज' सर्वांनाच मिळेल. त्याने तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल असं सचिनने या व्हिडीओत सांगितलं आहे. शिवाय तो या व्हिडीओमध्ये सीमाच्या तब्बेती बद्दलही सांगताना ही दिसत आहे. त्यामुळे नक्की हे सरप्राईज काय याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.
व्हिडिओने वाढवली उत्सुकता
व्हिडिओमध्ये सचिन म्हणतो, "मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी एक खूप मोठी बातमी घेऊन येत आहोत. ही एक ब्रेकिंग न्यूज असेल.पण सध्या मी त्याच कामात व्यस्त आहे. दोन-तीन महिन्यांनंतर ती मोठी ब्रेकींग न्यूज तुमच्या समोर येईल." सचिनचे हे बोलणे ऐकून त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकजण हे सरप्राईज काय असेल, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही व्हिडीओ सध्या कमी बनवत आहोत. पण तुम्हाला हे सरप्राईज नक्की मिळेल असं ही सचिन या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.
यापूर्वीही केली होती 'सरप्राईज'चे अनाऊंसमेंट
याआधीही सीमा आणि सचिनने अशाच प्रकारे त्यांची मुलगी भारतीच्या जन्माची बातमी दिली होती. त्यावेळीही सीमाच्या गर्भवती पणाबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. नंतर ती बातमी खरी ठरली. त्यामुळेच यावेळीही लोकांचे अंदाज अधिक तीव्र झाले आहेत. त्यांनाही नवीन सरप्राईज म्हणजे सचिन सीमाच्या घरी नवा पाहूणा येणार आहे की काय असा अंदाज सर्व जण लावत आहेत.
युजर्सनी उघड केले 'सरप्राईज'चे रहस्य?
सीमा-सचिनचा व्हिडिओ पाहताच सोशल मीडिया युजर्सनी आपापले तर्क मांडायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिले की, "बहुधा ते नवीन घर घेत आहेत." दुसऱ्याने म्हटले, "कदाचित नवीन गाडी घेत असतील. पण घराची शक्यता जास्त आहे." काही लोकांनी तर थेट 'कुटुंब वाढणार असल्या'चा अंदाज व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया युजर्स मार्फत येत आहेत. पण खरं उत्तर दोन तीन महिन्यानंतरच मिळणार आहे.
सीमा आणि सचिनने हा व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्याला लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. प्रत्येकाने आपापली मते दिली आहेत. परंतु खरे सरप्राईज काय आहे, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यासाठी त्यांच्या चाहत्यांना दोन ते तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. सीमा हैदरही पाकिस्तानातून सचिनवर असलेल्या प्रेमापोटी भारतात आली होती. त्यानंतर तिने सचिन बरोबर लग्न ही केले. त्यांना एक मुलगी ही झाली आहे. सध्या ती सचिन बरोबर राहाते.