'अशा नोकरीची ऐसी की तैसी...' बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर भडकला पोलीस अधिकारी, पाहा VIDEO

याच वादामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या हस्तक्षेपाचा आरोप करत गोंधळ घालू लागले.

जाहिरात
Read Time: 2 mins

यूपीच्या महाराजगंज जिल्ह्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धर्मांतराच्या एका प्रकरणावरून बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये पोलीस ठाण्यातच वाद झाला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर पोलीस अधिकारी म्हणाले की, "दोन मिनिटं लागतील सगळ्यांना सरळ करायला, राजीनामा देऊन निघून जाईन. अशा नोकरीची ऐसी की तैसी करतो, राजीनामा देऊन निघून जाईन." सध्या या प्रकरणी पोलिसांनी चार लोकांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे.

खरंतर व्हायरल झालेला व्हिडिओ यूपीच्या महाराजगंज जिल्ह्यातील कोठीभार पोलीस स्टेशनमधील आहे. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिसोखोर गावातील एका मंदिराशी संबंधित आहे. जिथे दर तीन वर्षांनी धार्मिक कथा आणि पूजेचे आयोजन केले जाते. हे आयोजन यशस्वी करण्यासाठी गावातील काही लोक 26 ऑगस्ट रोजी वर्गणी गोळा करत होते.

नक्की वाचा - Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया

यावेळी काही लोकांमध्ये वाद झाला. कारण ते लोक वर्गणी देण्याऐवजी हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करू लागले असा आरोप होत आहे. याच वादामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या हस्तक्षेपाचा आरोप करत गोंधळ घालू लागले. पोलीस स्टेशनमधील वातावरण चांगलेच तापले. या गोंधळामुळे पोलीस अधिकारी चांगलेच संतापले. पोलीस स्टेशनमध्ये कार्यकर्त्यांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. याच दरम्यान, संतापलेल्या पोलीस अधिकारी धर्मेंद्र सिंह यांनी सगळ्यांसमोर नोकरी सोडण्याची धमकी दिली. त्यांनी पुढे म्हटले की, "दोन मिनिटं लागतील सगळ्यांना सरळ करायला, राजीनामा देऊन निघून जाईन.

 Manoj Jarange Patil : 'जरांगे फॅक्टर' पुन्हा चर्चेत! कोण करतं नियोजन, पडद्यामागील 8 कारभारी माहिती आहेत?

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, पोलीस कर्मचारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढताना दिसत आहेत. या घटनेनंतर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आहे. जो परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन धर्मांतरणाशी संबंधित आरोपींवर शांतता भंग केल्याबद्दल कारवाई केली आहे. त्याचबरोबर, पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक कृष्ण पाल यांच्या तक्रारीवरून चार लोकांविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे.

Advertisement