1500 वर्ष जुन्या मंदिरासह संपूर्ण गावावर केला होता Waqf Board नं दावा! काय आहे प्रकरण?

Waqf Act : हे संपूर्ण गाव आपल्या मालकीचं असल्याचा दावा वक्फनं केला होता. ते समजल्यानंतर गावकऱ्यांना धक्काच बसला. या गावात 1500 वर्ष जुनं मंदिर देखील आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Waqf Board : वक्फ बोर्डाकडं अनेक शक्तीशाली अधिकार आहेत. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:


Waqf Act : केंद्र सरकार वक्फ बोर्ड अधिनियमात बदल करण्याच्या तयारीत आहे. याबाबतचं विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर केलं जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच वक्फ बोर्डाचे अधिकार कमी करण्याबाबत विरोध सुरु झालाय. हा विरोध सुरु असतानाच एक गाव चर्चेत आहे. या गावातील एखादी इमारत किंवा जागा नाही तर संपूर्ण गावावरच 2022 साली वक्फ बोर्डानं दावा केला होता.

हे संपूर्ण गाव आपल्या मालकीचं असल्याचा दावा वक्फनं केला होता. ते समजल्यानंतर गावकऱ्यांना धक्काच बसला. आता सरकार वक्फ बोर्ड अधिनियमात बदल करणार असेल तर या गावाचा उल्लेख नक्की होईल. ज्या जागेवर तुम्ही अनेक वर्षांपासून राहता, तिथं अचानक कुणीतरी येऊन ती जागा तुमची नाही, असं म्हंटलं तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

तामिळनाडूमधील तिरुचेंथुरई या हिंदू बहुल भागातील गावकऱ्यांची देखील अशीच अवस्था झाली होती. या गावात 1500 वर्ष जुनं मंदिर देखील आहे. त्यानंतरही ही जमीन वक्फ बोर्डाची कशी असू शकते? हा प्रश्न आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या काठावर तिरुचिरापल्ली जिल्ह्यात तिरुचेंथुरई हे एक सुंदर गाव आहे. या गावात 1500 वर्ष जुनं सुंदरेश्वर मंदिर देखील आहे. या गावातील एका नागरिकाला त्याची शेत जमीन विकायची होती. त्यावेळी हे संपूर्ण गाव वक्फ बोर्डाचं असल्याचं त्याला समजलं. 

Advertisement
राजगोपाल यांना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांची 1.2 एकर संपत्ती तामिळनाडू वक्फ बोर्डाची आहे. त्यामुळे त्याची विक्री करण्यासाठी त्याला बोर्डाकडून एनओसी घ्यावी लागले. हे समजताच जमीन मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली.

धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या भागात मुसलनामांनांच्या राहण्याचा कोणताही पुरावा नव्हता. मुसलमानांची संपत्ती असल्याची काही माहिती नव्हती. त्यानंतरही एका अधिकाऱ्यानं त्याला सांगितलं की, गावतील सर्व जमीन वक्फ बोर्डाची आहे. त्यामुळे त्याची विक्री करण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला चेन्नईतील बोर्डाची एनओसी आणावी लागेल. 

( नक्की वाचा : वक्फ बोर्डाच्या 'अनिर्बंध' अधिकारांवर गंडांतर? मोदी सरकारचं मोठं पाऊल )
 

गावात मुस्लिमांची संपत्ती नाही

तिरुचेंथुरई गावातील अनेक एकर जमीन मंदिराच्या मालकीची आहे. त्या मंदिराच्या भिंतीवर तशी स्पष्ट नोंद आहे. हे मंदिर तब्बल 1500 वर्ष जुनं आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा दावा भक्कम आहे. पण, वक्फ बोर्डानं यावर कसा काय दावा केला? हा प्रश्न कायम आहे. हे प्रकरण तापल्यानंतर जिल्हा प्रशासनानं यावर स्पष्टीकरण दिलं.

Advertisement

या भागातील सर्व संपत्ती मुस्लिंमांकडं आहे, असा कोणताही रेकॉर्ड नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. त्यामुळे हे प्रकरम आणखी गुंतागुंतीचं बनलं.

वक्फ बोर्डाचा अर्थ काय?

वक्फचा अर्थ आहे 'अल्लाह के नाम' म्हणजेच जी जमीन कोणतीही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावावर नाही पण, तिचा मुस्लीम समाजाशी संबंध आहे, ती वक्फची जमीन होते. यामध्ये मशिद, मदरसे, कब्रस्तान, ईदगाह, मजार या प्रमुख जागांचा समावेश आहे. 

Advertisement

या जमिनींच्या ऐकेकळी गैरवापर होत असे. तसंच त्याची विक्रीही केली जात होती. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या जमिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात आला. रेल्वे आणि सैन्यानंतर वक्फ बोर्डाकडं सर्वात जास्त संपत्ती आहे. 

( नक्की वाचा : SC/ST मध्ये 'कोटा' अंतर्गत 'कोटा', सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचा अर्थ काय? )
 

नव्या विधेयकांमध्ये कोणत्या सुधारणा अपेक्षित?

  • नव्या विधेयकात वक्फ अधिनियामत 40 पेक्षा जास्त सुधारणा केल्या जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळानं शुक्रवारी या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
  • या विधेयकात अधिनियामातील काही कलमं रद्द करण्याचाही प्रस्ताव आहे. त्याचबरोबर वक्फ बोर्डाचे पुनर्गठन, बोर्डाच्या संरचनेत बदल आणि बोर्डाकडून वक्फची संपत्ती घोषित करण्यापूर्वी जमिनीची पडताळणी करण्याच्या सुधारणा नव्या विधेयकात असतील. 
  • वक्फ अधिनियमातील कलम 9 आणि कलम 14 मध्येही सुधारणा करण्याचा या विधेयकात प्रस्ताव आहे. त्यामुळे केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डामध्ये बदल करता येतील आणि त्यामध्ये महिलांचे प्रतिनिधित्वही निश्चित होईल.
  • या विधेयकात राज्य वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात आलेल्या वादग्रस्त जमिनीची नव्यानं पडताळणी करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या देशभरात 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून 30 वक्फ बोर्ड आहेत.