पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. आधी सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानचे पाणी रोखले होते. त्यानुसार चिनाब नदीवर बनलेल्या सलाल आणि बगलीहार धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. पण, आता भारताने पाकिस्तानला दुहेरी दणका दिला आहे. भारताने दोन्ही धरणांचे सर्व दरवाजे एकाच वेळी उघडले आहेत. यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेले आहे. त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानमध्ये (Water Attack on Pakistan) पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चिनाब नदीवर बनलेल्या सलाल आणि बगलीहार धरणाचे दरवाजे भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर बंद केले होते. याने पाकिस्तानवर एक प्रकारे वॉटर स्ट्राईक करण्यात आला होता. पण, आता भारताने दोन्ही धरणांचे अनेक दरवाजे एकाच वेळी उघडले आहेत. अशा परिस्थितीत आता पाकिस्तानमध्ये पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे. त्यानंतर चिनाब नदीवर बनलेल्या सलाल आणि बगलीहार धरणांवरील सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसामुळे तापमानातही घट झाली आहे. पण, पाणी साचल्यामुळे लोकांची गैरसोय वाढली आहे. रामबन जिल्ह्यातील चंबा सेरी येथे भूस्खलन झाल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक प्रवासी अडकले आहेत.
दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर चिडलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा डावा आखला होता. मात्र भारताच्या सतर्क सैन्याने त्यांचा हा डाव उधळून लावला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अनेक शहरातील रडार यंत्रणावर हल्ला करते ते उद्धवस्त केले आहेत. त्यात पाकिस्तानी रडार यंत्रणेचे मोठे नुकसान झाल्याचे सुत्रांकडून समजत आहेत. हे हल्ले भारताने ड्रोनच्या माध्यमातून केले. लाहोरमधील रडार यंत्रणाही भारतीय लष्कराने उद्धवस्त केले आहे. त्यात आता Water Attack केल्याने पाकिस्तानची दुहेरी कोंडी झाली आहे.