देशाला हादरवणाऱ्या वायनाडमधील दुर्घटनेत आतापर्यंत 308 मृत्यू; छिन्नविछिन्न अवस्थेत सापडतायेत मृतदेह

उरलेल्या 195 लोकांच्या मृतदेहाचा कोणी एक भाग सापडला आहे. ज्यावरूनच मृतांचा आकडा निश्चित करण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
वायनाड:

केरळच्या वायनाडमध्ये (Wayanad landslide) भूस्खलनाला तीन दिवस उलटले आहे. मात्र आज चौथ्या दिवशीही ढिगाऱ्याखालून मृतदेह काढले जात आहे. या अपघातात आतापर्यंत 308 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र रेस्क्यूचं काम करणाऱ्या जमावाला आतापर्यंत 195 मृतदेह सापडले आहेत. इतर लोकांच्या मृत्यूची पुष्ठी त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरून केली जात आहे. म्हणजे उरलेल्या 195 लोकांच्या मृतदेहाचा कोणी एक भाग सापडला आहे. ज्यावरूनच मृतांचा आकडा निश्चित करण्यात आला आहे. 

लष्कर, हवाई आणि नेव्हीसह 40 बचावपथक रेस्क्यूचं काम करीत आहे. रेस्क्यू ऑपरेशन अधिक चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सर्चश्रेक्ष सहा विविध भागांमध्ये वाटण्यात आलं आहे. तिन्ही सैन्याव्यतिरिक्त NDRF, DSG, MEG ची संयुक्त टीम तपास अभियानात आहेत. या प्रत्येक टीमसह स्थानिकांचा, एक वन विभाग कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.  

नक्की वाचा - हिमाचलमध्ये पावसाचं रौद्ररूप; 3 ठिकाणी ढगफुटी, अख्खी इमारत कोसळली, धक्कादायक Video

भूस्खलनानंतर वायनाडमध्ये 308 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी शोध आणि बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर केरळमध्ये चारुलमाला गाव ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. चारुलमाला गावात अनेक जण झोपेत असतानाच डोंगरातून आलेल्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. घटनास्थळी सकाळपासून एनडीआरआफ,  लष्कर, वायूसेनेची पथकं बचावकार्यात प्रयत्नांची शर्थ करताय. दरम्यान आज घटनास्थळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं.