Operation Sindoor दरम्यान पाकिस्तानला किती नुकसान झालं? हवाई दलाच्या प्रमुखांचं पहिल्यांदाच अधिकृत वक्तव्य

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला किती नुकसान झालं याबाबत भारतीय हवाई दलाकडून हे पहिलंच अधिकृत विधान आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचं हवाई दलाच्या प्रमुखांनी सांगितलं.

वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • ऑपरेशन सिंदूर के दौरान भारतीय वायुसेना ने पाकिस्तान के छह विमानों को पूरी तरह तबाह कर दिया था
  • गिराए गए विमानों में पांच फाइटर जेट्स और एक टोही विमान AWACS शामिल था
  • वायुसेना प्रमुख ने इस ऑपरेशन के जरिए पाकिस्तान को एक स्पष्ट संदेश देने का दावा किया
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी संघटनेकडून सर्वसामान्यांना टार्गेट करण्यात आलं. देशातील कित्येक हिंदू नागरिकांची त्यांच्या पत्नी-मुलांसमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याचा सूड उगविण्यासाठी भारताचे सिंदूप ऑपरेशनअंतर्गत दहशतवादी संघटनांच्या पाकिस्तानमधील अड्डे उद्ध्वस्त केले. दरम्यान याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. 

भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' या लष्करी कारवाईत पाकिस्तानच्या हवाई दलाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी दिली आहे. या कारवाईत पाकिस्तानचे पाच लढाऊ विमानं आणि एक मोठे विमान पाडण्यात आले. तसेच जमिनीवर असलेली किमान दोन विमानं नष्ट करण्यात आली, अशी माहिती सिंग यांनी दिली. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे.

बंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी एस-400 हवाई संरक्षण प्रणालीला हवाई हल्ल्यांचं श्रेय दिले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला झालेल्या नुकसानीबाबत भारतीय हवाई सैन्याकडून पहिलंच अधिकृत वक्तव्य समोर आलं आहे. 

Advertisement

Add image caption here

हवाई दल प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडलेले मोठे विमान हे AWACS (एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम) किंवा इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म असल्याचा अंदाज आहे. भारताने या हवाई हल्ल्यासाठी रशियन बनावटीच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केला होता, ज्यामुळे हे यश मिळालं.

Advertisement

नक्की वाचा - PM Modi: 'आता आम्ही फक्त स्वदेशी वस्तूच विकू', ट्रम्प यांच्या टॅरिफ स्ट्राईकनंतर PM मोदींचे चोख उत्तर

'ऑपरेशन सिंदूर' हे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने दिलेले प्रत्युत्तर होतं. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण नऊ लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हवाई दल प्रमुख सिंग यांनी उपग्रहाद्वारे घेतलेली काही छायाचित्रेही सादर केली. या छायाचित्रांतून, 7 मे रोजी झालेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे बहावलपूर येथील मुख्यालय आणि लष्कर-ए-तैयबाचे मुरीदके येथील मुख्यालय यांसारख्या दहशतवादी तळांवर कोणतेही अतिरिक्त नुकसान झाले नसल्याचे स्पष्ट झाले. यातून भारताच्या हवाई हल्ल्यांची अचूकता दिसून येते.