पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. त्यामुळे पाकिस्तान हादरला आहे. मध्यरात्री पाकिस्तानच्या 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानची झोप उडवली. या हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट झाले आहेत. भारताने बदला घेतला. त्यानंतर संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. या ऑपरेशननंतर रझा अकादमीची ही भूमीका आता समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रझा अकादमीच्या प्रमुखांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रीया दिली आहे. "दहशतवाद्यांना मातीत मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, संपूर्ण हिंदुस्तान तुमच्या हिंमतीला, धैर्याला आणि बहादुरीला सलाम करतो." असं संस्थेचे प्रमुख असीर-ए-मुफ्ती-ए-आझम अल्हाज मोहम्मद सईद नूरी यांनी म्हटलं आहे. सध्या ते दिल्ली दौऱ्यावर आहेत. तेथे आयोजित एका बैठकीत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रीया दिली. शिवाय भारतीय सैन्याचे कौतूक केले. शिवाय अकादमी तर्फे मिठाई ही वाटण्यात आली.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
"भारतीय सेना एक मजबूत लोखंडी भिंत आहे, जी नेहमी देश आणि समाजाच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण करण्यास तयार असते. आम्ही आमच्या सैन्याचे मनापासून अभिनंदन करतो. शत्रू कोणत्याही बिळात लपलेला असला तरी, त्याला शोधून संपवा. आम्ही तुमच्या प्रत्येक ऑपरेशनला उघडपणे समर्थन करतो." असं ही नुरी यावेळी म्हणाले. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला माणुसकीला काळीमा फासणारा होता. आमच्या बहिणींकडून त्यांचे सौभाग्य हिरावून घेतले गेले. मुलांना अनाथ केले गेले. म्हणून गुन्हेगारांना शिक्षा मिळालीच पाहिजे असं ही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर
ऑल इंडिया सुन्नी जमीयत-उल-उलमाचे उपाध्यक्ष हज़रत सईद नूरी यांनी शेवटी म्हटले की, "ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडा मिळाला आहे. आमच्या मनात जे होतं तेच सैन्याने केले. मुसलमान पहिल्या दिवसापासून म्हणत होते की शत्रूंविरुद्ध कठोर कारवाई करावी. दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर बॉम्बफेक करावी. सैन्याने ते करून दाखवले आहे. या ऑपरेशनमुळे आम्ही आनंदी आहोत, असं म्हणत त्यांनी सैन्याचं कौतूकही केलं.