जाहिरात

भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर

या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात काय काय घडत आहे यावर एक लक्ष टाकूयात.

भारताच्या Operation Sindoor नंतर पाकिस्तानात काय चाललंय? 'या' 10 गोष्टी आल्या समोर

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान विरोधात भलताच आक्रमक झाला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. त्यात दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त झाले. यात मुजफ्फराबाद, कोटली, बहावलपूर, रावळकोट, चक्सवारी, भीमबर, नीलम व्हॅली, झेलम आणि चकवाल या ठिकाणी हा स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानात काय काय घडत आहे यावर एक लक्ष टाकूयात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

  1. भारताच्या एअर स्ट्राईकमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे विश्लेषण करण्यासाठी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. त्यात जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते.
  2. एअर स्ट्राईक होताच लाहोर आणि कराची विमानतळावरून सर्व विमानांचे उड्डाण थांबवण्यात आले होते. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, 8 तासांच्या बंदीनंतर काही विमानांना उड्डाणाची परवानगी देण्यात आली.
  3. इस्लामाबादच्या डेप्युटी कमिशनरने घोषणा केली की पाकिस्तानच्या राजधानीतील सर्व सरकारी आणि खाजगी शैक्षणिक संस्था बंद राहतील.
  4. इंटरमीडिएट आणि माध्यमिक शिक्षण मंडळ लाहोरने घोषणा केली आहे की आज होणारी इंटरमीडिएट आणि मॅट्रिकची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
  5. रावळपिंडीच्या जिल्हा प्रशासनाने सर्व सार्वजनिक आणि खाजगी शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा केली आहे.
  6. संपूर्ण रावळपिंडी आणि पंजाब प्रांतात सार्वजनिक रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. संपूर्ण पंजाब प्रांतात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
  7. भारताच्या एअर स्ट्राईकचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारातही दिसून आला. पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये इंट्राडे व्यवहारात 6,500 अंकांची मोठी घसरण झाली. सकाळी 9:30 वाजता बाजार उघडल्यावर बेंचमार्क केएसई-100 निर्देशांक मागील दिवसाच्या तुलनेत 6,560.82 अंकांनी किंवा 5.78 टक्क्यांनी खाली होता.
  8. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग चे सामने नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहतील असं स्पष्ट केलं आहे. इस्लामाबाद युनायटेड आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर क्वेटा ग्लॅडिएटर्सशी खेळणार आहे.
  9. दक्षिण कोरिया, तैवान, मलेशिया आणि थायलंडच्या एअरलाइन्सने पाकिस्तानवरून जाणारी किंवा तेथे जाणारी अनेक विमाने वळवली आहेत. काही विमाने रद्द केली आहेत.
  10. खैबर पख्तूनख्वा सरकारने आपत्कालीन तयारीच्या उपायांसाठी एक विस्तृत सूचना जारी केली आहे. जिल्हा प्रशासनाला शाळा, सामुदायिक हॉल आणि मशिदींसह निवारास्थाने सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवाय आणीबाणीच्या काळात मदत करणाऱ्या संस्थानाही अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com