Padma Awards 2026 : भारत सरकाराने 77 व्या प्रजाकसत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील दिग्गज व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान केला आहे. देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा शौर्य व सेवा पदके देऊन सन्मान करण्यात आला आहे. पद्म पुरस्कारांची घोषणा केल्यानंतर अनेकांना एकच प्रश्न पडतो की, हे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार नक्की काय आहेत? यामधील सर्वात मोठा सन्मान कोणता? आणि हे पुरस्कार मिळाल्यावर नेमके काय मिळतं? जाणून घेऊया या पुरस्कारांमधील फरक आणि त्यांच्यासोबत मिळणाऱ्या सुविधांबद्दल.
पद्म पुरस्कार काय आहेत?
हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत.
हे पुरस्कार खालील क्षेत्रांमध्ये असाधारण कामगिरी किंवा उल्लेखनीय सेवांसाठी दिले जातात:
- कला
- साहित्य
- शिक्षण
- क्रीडा
- वैद्यकीय सेवा
- समाजसेवा
- विज्ञान
- अभियांत्रिकी
- लोककल्याण
- नागरी सेवा
- उद्योग व व्यापार
- तसेच इतर विविध क्षेत्रे
पद्म पुरस्कारांच्या तीन श्रेणी आहेत :
- पद्मविभूषण: देशाचा दुसरा सर्वात मोठा नागरी सन्मान
- पद्मभूषण: देशाचा तिसरा सर्वात मोठा नागरी सन्मान
- पद्मश्री: देशाचा चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान
पद्मविभूषण आणि पद्मभूषण यांतील फरक
पद्मविभूषण (Padma Vibhushan)
- हा भारताचा दुसरा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे (भारत रत्ननंतर).
- हा सन्मान अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी कोणत्याही क्षेत्रात ‘असाधारण आणि विशिष्ट' (Exceptional and Distinguished) कामगिरी केली असेल म्हणजे असे कार्य, जे जगासाठी आदर्श किंवा प्रेरणादायी ठरेल, आणि ज्याचा प्रभाव अत्यंत मोठा मानला जाईल.
नक्की वाचा >> अकोल्यात कोण होणार महापौर? इच्छुकांची मांदियाळी, भाजपच्या 'या' 5 उमेदवारांची नावं आघाडीवर
पद्मभूषण (Padma Bhushan)
हा भारताचा तिसरा सर्वात मोठा नागरी सन्मान आहे.
हा पुरस्कार ‘उच्च कोटीची विशिष्ट सेवा' केल्याबद्दल दिला जातो.
म्हणजेच, एखाद्या व्यक्तीने आपल्या क्षेत्रात दीर्घ कालावधीपर्यंत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय काम केले असेल, तर त्याला या सन्मानाने गौरविण्यात येते.
हे पुरस्कार मिळवणाऱ्यांना पैसा मिळतो का?
नाही. या पुरस्कारांसोबत कोणतीही रोख रक्कम दिली जात नाही.
तसेच रेल्वे/विमान प्रवासासाठी कोणताही भत्ता, सवलत किंवा विशेष सुविधा दिली जात नाही.
मग पुरस्कारात काय मिळते?
राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र
एक पदक (Medal)
यासोबत पदकाची एक प्रतिकृती, जी ते आपल्या इच्छेनुसार कोणत्याही समारंभात किंवा राजकीय कार्यक्रमांमध्ये परिधान करू शकतात. हा सन्मान मिळालेला व्यक्ती आपल्या नावाच्या पुढे किंवा मागे ‘पद्मभूषण', ‘पद्मविभूषण' किंवा ‘पद्मश्री' असा टायटल म्हणून वापरू शकत नाही.
(जसे डॉक्टर, पंडित इत्यादी उपाध्या वापरल्या जातात, तसे हे पद वापरण्यास मनाई आहे.)
नक्की वाचा >> मुलाने वृद्ध आईला पहिल्यांदाच विमानात नेलं..भावनिक व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, "आजीने जमीन तुमच्या नावावर.."
कोणाला मिळू शकतो हा सन्मान?
हा पुरस्कार कोणत्याही जात, लिंग किंवा व्यवसायातील व्यक्तीला मिळू शकतो.
मात्र, सरकारी कर्मचारी (वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी आणि शास्त्रज्ञ यांना वगळून) या पुरस्कारासाठी पात्र नसतात.