जाहिरात

मुलाने वृद्ध आईला पहिल्यांदाच विमानात नेलं..भावनिक व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, "आजीने जमीन तुमच्या नावावर.."

एखाद्या वृद्ध आईचा वाढदिवस असावा आणि आपण तिला पहिल्यांदाच विमानप्रवास घडवून आणावा,यापेक्षा सुंदर क्षण आणखी काय असू शकतं..एका मुलाने हेच करून दाखवलं..व्हायरल व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

मुलाने वृद्ध आईला पहिल्यांदाच विमानात नेलं..भावनिक व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, "आजीने जमीन तुमच्या नावावर.."
Mother And Son Emotional Video
मुंबई:

Man And Old Age Mother Viral Video : एखाद्या वृद्ध आईचा वाढदिवस असावा आणि आपण तिला पहिल्यांदाच विमानप्रवास घडवून आणावा,यापेक्षा सुंदर क्षण आणखी काय असू शकतं..एका मुलाने हेच करून दाखवलं..पण इंडिगोच्या क्रू मेंबर्सने जेव्हा हे सर्व पाहिलं, तेव्हा त्यांनी या आईसाठी केलेलं कृत्य आनंद द्विगुणित करणारं होतं.क्रूने सरप्राइज म्हणून दिलेला छोटासा,गोड संदेश पाहून त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर उजळलेलं स्मितहास्य पाहण्यासारखं होतं. 

विमानात पहिल्यांदाच प्रवास करणे हा अविस्मरणीय क्षण असू शकतो. एका मुलाने त्याच्या आईला ही आठवण जपून ठेवण्याची संधी दिली. तो व्यक्ती आईला पहिल्या विमानप्रवासासाठी घेऊन गेला आणि आईच्या आनंदाने उजळलेला चेहरा पाहून अनेकांचे डोळे पाणावले.हे सुंदर दृष्य कॅमेरकात कैद झालं असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण इंडिगोच्या क्रू मेंबर्सने आईच्या आनंदाला चार चाँद लावण्याचं काम केलं.

नक्की वाचा >> अकोल्यात कोण होणार महापौर? इच्छुकांची मांदियाळी, भाजपच्या 'या' 5 उमेदवारांची नावं आघाडीवर

आईची पहिली फ्लाईट होतीच, पण..

व्हिडीओच्या सुरुवातीला पाहू शकता की, ज्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे, त्या यश शर्मा यांच्या समोर इंडिगो क्रू मेंम्बर सुहानी उभी असते.तिच्या हातात एक नोट असते. ती नोट घेतना यश म्हणतो “वी आर सो ग्रेटफुल, सुहानी.” ज्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे,त्या दिवशी यशच्या आईची पहिली फ्लाइट होतीच.पण विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवसही होता. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात खळबळ! विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु होतं सेक्स रॅकेट, पोलीस येताच 'त्या' 5 तरुणी..

आईचा व्हिडीओ अनेकांना भावुक करणारा

यश व्हिडीओच्या सुरुवातीला सांगतात, हा व्हिडिओ शेअर करताना यशने इंडिगोच्या क्रूचे आभार मानत एक कौतुकाचा कॅप्शनही लिहिला आहे. त्यांनी लिहिले आहे की इंडिगो क्रूने ‘ट्रॅव्हलला सेलिब्रेशनमध्ये बदलून टाकले'. दरम्यान, हा व्हिडीओ खूप भावुक करणारा आहे. कारण आईचं स्मितहास्य कोणाचंही मन जिंकून घेईल. या व्हिडिओवर अनेक इमोशनल कमेंट्स येत आहेत. बहुतेक लोकांनी आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जण मजेशीर कमेंट्सही करताना दिसतात.एका युजरने लिहिले आहे “इतकं काही सासरच्या लोकांसाठी केलं असतं,तर आजीने जमीन तुमच्या नावावर करून दिली असती”


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com