Meta Instant Messaging App: ज्याची भीती होती WhatsApp ने तेच केले

Youtube किंवा Facebook वर तुम्हाला जशा जाहिराती बघाव्या लागतात, तशा आता त्या व्हॉटसअपवर बघाव्या लागणार आहेत. Meta ने याची अधिकृत घोषणा केली आहे. या जाहिराती कशा दिसतील ? तुम्हाला यामुळे काय फायदा-तोटा आहे, पाहूयात.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

ज्या गोष्टीची भीती असंख्य व्हॉटसअप वापरकर्त्यांना सतावत होती, ती भीती खरी ठरली आहे. यापुढे व्हॉटसअपवरही जाहिराती दिसतील अशी घोषणा मेटाने केली आहे. Meta ने 2014 साली 19 अब्ज डॉलर्स खर्च करत व्हॉटसअप विकत घेतलं होतं. खरंतर तेव्हापासूनच व्हॉटसअप वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार अशी भीती सतावू लागली होती. व्हॉटसअप जाहिराती दाखवेल आणि त्यातून ग्राहकांच्या खिशातून पैसे काढेल अशी भीती वर्तवण्यात आली होती, जी खरी ठरताना दिसते आहे. मात्र जाहिराती दाखवणे, ग्राहकांकडून पैसे घेणे यासाठी व्हॉटसअपने 11 वर्ष घेतली आहे. आतापर्यंत व्हॉटसअप आणि त्याची सगळी फिचर्स वापरणं हे निशुल्क होतं. 

जाहिराती कुठे आणि कशा दिसणार ?

व्हॉटसअपने जाहिरात (Ads in WhatsApp) दाखवण्यासाठी गरजेचे असलेले अपडेट प्रसारीत करण्यासाठी 11 वर्षे वाट पाहिली आहे.  गेल्या दोन वर्षात व्हॉटसअपने UPDATE टॅब पूर्णपणे बदलला होता. पूर्वी अपडेट टॅबमध्ये स्टेटस दिसत होतं. यापुढे व्हॉटसअप वापरणाऱ्यांना Status मध्ये जाहिराती दिसायला लागतील.  म्हणजेच गेल्या 2 वर्षांपासून यासाठीची तयारी सुरू झाली होती. 

Advertisement

व्हॉटसअ चॅनेलसाठी पैसे मोजावे लागणार

तुम्ही तुमच्या आवडीचे व्हॉटसअप चॅनेल्स पाहण्यासाठी आणि त्यातून माहिती, मजकूर मिळवण्यासाठी वापकर्त्यांना मासिक शुल्क (WhatsApp Channel Monthly Fee ) भरावे लागेल. मासिक शुल्क भरून वापरकर्ते व्हॉटसअप चॅनल सबस्क्राइब करू शकतील. त्यानंतरच तुम्हाला त्या चॅनेलद्वारे विशेष अपडेट्स आणि कन्टेन्ट मिळू शकेल. सध्या व्हॉटसअप चॅनेल सबस्क्राइब करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही.  व्हॉटसअपच्या या निर्णयामुळे कन्टेन्ट क्रिएटर्सना कमाईचा आणखी एक मार्ग मिळू शकेल.

Advertisement

क्रिएटर्सना होणार फायदा

यासोबतच, क्रिएटर्स त्यांचा चॅनल प्रमोट करू शकतील. यूजर्स नवीन चॅनेल्सना Recommendations द्वारे शोधू शकतील. चॅनल ॲडमिनना पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नव्या बदलाचा फायदा होऊ शकेल.  याशिवाय महत्त्वाचे म्हणजे व्हॉटसअप जे अपडेट आणेल ते अपडेट केल्यानंतर तुम्हाला अपडेट टॅबमध्ये जाहिराती दिसतील. जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ती जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यासोबत संवाद साधू शकाल. तिथेच तुम्हाला त्या कंपनीची उत्पादनांबद्दल माहिती मिळू शकेल.   

Advertisement

व्हॉटसअपने म्हटलंय की मेसेज, चॅट्स, कॉल्स, ग्रुप चॅट्स अजूनही एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (End-to-End Encrypted) राहतील. जाहिरातींसाठी मर्यादित डेटा वापरला जाईल. जर तुम्ही तुमचे व्हॉटसअप अकाऊंट मेटा अकाउंट सेंटरशी लिंक केले असेल, तर तुमची आवड-निवड मेटाच्या इतर ॲप्ससोबतही शेअर केली जाईल. मात्र तुमचा फोन नंबर जाहिरातदारांसोबत शेअर केला जाणार नाही आणि खासगी चॅटमध्ये कोणतीही जाहिरात दिसणार नाही. 

जाहिराती कधीपासून दिसणार?

जाहिराती कधीपासून दिसू लागणार हे अद्याप कळू शकलेलं नाही. एकाचवेळी जगभरात हे अपडेट जारी केले जाईल. iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी हा बदल असणार आहे.