भारतातील पहिली बुलेट ट्रेन प्रत्यक्षात कधीपासून धावणार?

सध्या अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करू शकेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

2023 मध्ये बुलेट ट्रेन धावणार असल्याचं आश्वासन तत्कालिन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिलं होतं. मात्र अद्याप भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची प्रतीक्षाच आहे. या ट्रेनची चाचणी 2026 मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विद्यमान केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनला 28 सिस्मोमीटर प्रणालीने सुसज्ज करण्याची घोषणा केली आहे. 

काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्ट्ये-

मुंबई ते अहमदाबाद या 508 किमी अंतरावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. यातला 156 किमीचा मार्ग महाराष्ट्रातून, 351 किमी गुजरातमधून जाणार आहे. या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 12 स्थानकं असणार आहेत. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, साबरमती ही ती 12 स्थानकं आहेत. 

सध्या अहमदाबाद-मुंबई अंतर रेल्वेनं पार करण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. बुलेट ट्रेन हे अंतर तुरळक स्टॉपसह अवघ्या 2 तास 7 मिनिटांत पूर्ण करू शकेल. सर्व स्टॉप घेतले तर हे अंतर 2 तास 58 मिनिटांत पार होणार आहे. एकूण 1 लाख 8 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

सुरक्षा आणि खर्चाच्या दृष्टीनं ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड म्हणजे उन्नत मार्गावर करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. फक्त मुंबईतले स्टेशन वगळले तर इतर सर्व ट्रॅक हा एलिव्हेटेड असणार आहे. 

Advertisement

बुलेट ट्रेनमधील सिस्मोमीटर प्रणाली

सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रणाली अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भारतातील पहिल्या बांधकामाधीन बुलेट ट्रेनला सिस्मोमीटर प्रणालीने सुसज्ज करण्यामागील मुख्य उद्देश भूकंप लवकर ओळखणे हा आहे. यामुळे प्रवासादरम्यान संभाव्य धोके कमी करता येऊ शकेल. 

भारत या महिन्याच्या अखेरीस जपानकडून पहिल्या सहा E5 मालिकेतील शिंकानसेन ट्रेन (बुलेट ट्रेन) खरेदी करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब करणार आहे. देशात बुलेट ट्रेन प्रकल्पावर ज्या पद्धतीने काम केले जात आहे ते पाहता, जून-जुलै 2026 मध्ये गुजरातमध्ये पहिली ट्रेन सुरू करण्याचा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) या वर्षी 15 ऑगस्टपर्यंत ट्रेन, ऑपरेटिंग सिस्टम खरेदीसह सर्व करारांसाठी बोली लावणार आहे.

Advertisement