पाकिस्तानला आता त्याची लायकी दाखवण्याची वेळ आली आहे. दिल्लीत होत असलेल्या बैठकीची कंपनं इस्लामाबादमध्ये जाणवत आहेत. मोदी सरकारनं मंगळवारी चार उच्च स्तरीय बैठका घेतल्या. त्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाच मोठ्या बैठका घेतल्या. या बैठकीनंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लाग समितीच्या (NSAB) सदस्यांना बदलण्यात आल्याची माहिती उघड झाली.
युद्धाचा मोठा अनुभव असणाऱ्या 7 अनुभवी सदस्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हे सर्व जण अर्जुनाप्रमाणे माशाचा डोळा भेदण्यासाठी ओळखले जातात.यामध्ये गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांसह सेना, नौदल आणि वायूदलातील तज्ज्ञांचा समावेश आहे. हे सर्व जण पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी लिहिणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आर. आलोक जोशी
माजी आयपीएल अधिकारी आ. अलोक जोशी 2012 ते 2014 पर्यंत भारतीय गुप्तचर यंत्रणा RAW चे प्रमुख होते. त्यांना पाकिस्तानचा इंच आणि इंच माहिती आहे. पाकिस्तानी सैन्य आणि ISI काय करु शकतं ते किती धोकादायक आहेत हे त्यांना चांगलं माहिती आहे.
डी. बी. व्यंकटेश वर्मा
माजी IFS अधिकारी डी. बी. व्यंकटेश वर्मा हे 2019 ते 2021 दरम्यान रशियामध्ये राजदूत होते. पाकिस्तानबरोबरच्या चर्चेतही त्यांचा सहभाग होता. दक्षिण आशियातील सुरक्षेबाबत ते तज्ज्ञ मानले जातात.
( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे? )
एयर मार्शल पंकज मोहन सिन्हा
एअर मार्शल पंकज मोहन सिन्हा यांनी पश्चिम वायूदलाचे प्रमुख म्हणून काम केलं आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण, त्यांच्याकडं 4,500 तासंपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव आहे. ते लढाऊ वैमानिक आहेत.
लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह
माजी लेफ्टनंट जनरल ए.के. सिंह यांनी साऊदर्न कमांडचे जनरल कमांडिंग-इन-चीफ म्हणून काम केलं आहे. याचा अर्थ त्यांच्याकडं दक्षिण भारताचं नेतृत्त्व होतं. त्यांचा पाकिस्तानशी नियमित संपर्क होता. पाकिस्तानची सीमी सुरक्षित करणे आणि लष्करी रणनिती तयार करणे ही त्यांची जबाबदारी होती.
रियर एडमिरल मोंटी खन्ना
रियर एडमिरल मोंटी खन्ना यांनी नौदलामध्ये अनेक महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे. ते नेव्ही वॉर कॉलेजचे कमांडेट देखील होते. नौदल कशा प्रकारे कारवाई करु शकते याबाबत त्यांचा मोठा अनुभव आहे.
राजीव रंजन वर्मा
राजीव रंजन वर्मा यांनी उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये महासंचालक म्हणून काम केलं आहे. ते 1990 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. सुरक्षा आणि कायदा सूव्यवस्था या विषयातील ते तज्ज्ञ आहेत.
मनमोहन सिंह
माजी IPS अधिकारी मनमोहन सिंह यांनी अनेक राज्यांमध्ये सुरक्षेची जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केलं आहे.