Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाचा नंबर गेम: NDA की INDIA? विजयाचे गणित काय सांगते?

Who Will Win the Vice President Election? : देशाचा 17 वा उपराष्ट्रपती कोण होणार? याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 5 mins
Vice President Election : या पदासाठी मंगळवारी (9 सप्टेंबर ) रोजी मतदान होणार आहे.
मुंबई:

Who Will Win the Vice President Election? : देशाचा 17 वा उपराष्ट्रपती कोण होणार? याचं उत्तर काही तासांमध्ये मिळणार आहे. या पदासाठी मंगळवारी (9 सप्टेंबर ) रोजी मतदान होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ही निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. तरीही विजयाचे अंतर मागील काही निवडणुकांपेक्षा कमी असू शकते, असे सूत्रांनी NDTV ला सांगितले आहे. यामुळे NDA गाफील  न राहता प्रत्येक मतांची जुळवाजुळव करत आहे. 

उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या सर्व सदस्यांद्वारे गुप्त मतदानाने केली जाते. याचा अर्थ खासदार त्यांच्या इच्छेनुसार मतदान करू शकतात, जरी ते सहसा पक्षीय भूमिकेनुसारच मतदान करतात. मात्र, क्रॉस-व्होटिंग सामान्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, माजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस आणि माजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (BRS) अनेकदा भाजपला पाठिंबा दिला आहे. 

उदाहरणार्थ, 2022 मध्ये, जगदीप धनखड यांनी त्यांच्या विरोधात असलेल्या पक्षांच्या मोठ्या पाठिंब्यामुळे गेल्या तीन दशकांतील सर्वात मोठा विजय मिळवला होता. यात YSR काँग्रेस आणि त्यावेळी ओडिशाचे मुख्यमंत्री असलेले नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाच्या (BJD) मतांचा समावेश होता. श्री. धनखड यांना जवळपास 75 टक्के मते मिळाली होती.

यावेळीही क्रॉस-व्होटिंग होण्याची शक्यता आहे.

( नक्की वाचा : Vice President Election FAQ : उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक: मतदान कसं होतं, कोण करतं? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे )
 

उपराष्ट्रपती निवडणूक 2025: भाजपचे संख्याबळ

सध्या, 239 राज्यसभा खासदार आणि 542 लोकसभा खासदार आहेत, जे सर्वजण मतदानासाठी पात्र आहेत. मात्र, माजी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल (BJD) आणि माजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती (BRS) दोन्ही पक्ष निवडणुकीत गैरहजर राहणार असल्याची पुष्टी झाल्याने, मतदान करणाऱ्या खासदारांची एकूण संख्या 770 पर्यंत खाली आली आहे आणि बहुमताचा आकडा 386 वर स्थिरावला आहे.

Advertisement

NDA कडे 427 खासदार आहेत. त्यामुळे, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे भाजपचे उमेदवार म्हणून स्पष्टपणे विजेते ठरतील. सत्ताधारी पक्ष माजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी आणि त्यांच्या YSR काँग्रेसच्या 11 खासदारांच्या पाठिंब्यावरही अवलंबून आहे.

BRS ने निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय का घेतला हे स्पष्ट नाही. तथापि, पक्षातील अंतर्गत गोंधळ (KCR यांच्या कन्या के. कविता यांचा राजीनामा आणि भाजप तसंच काँग्रेस या दोन्ही पक्षांविरुद्ध आक्रमक भूमिका) पाहता हे आश्चर्यकारक नाही. BRS चे लक्ष जुबली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीवरही आहे, जिथे मुस्लीम मतांची भूमिका महत्त्वाची आहे. 2018 आणि 2023 मध्ये मगांती गोपीनाथ यांनी हा मतदारसंघ जिंकला होता, त्यांचे निधन जूनमध्ये झाले.

Advertisement

BJD कडून पाठिंबा अपेक्षित होता, परंतु गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ज्या पक्षाने त्यांना पराभूत केले, त्या पक्षाला पाठिंबा देणे नवीन पटनायक यांनी टाळले असल्याचे दिसते. असे असले तरी, BRS आणि BJD वगळताही, YSR काँग्रेसच्या मतांसह NDA कडे 438 मते असतील. आणि हा आकडा आणखी वाढू शकतो. स्वाती मालीवाल या आम आदमी पक्षाच्या (AAP) राज्यसभा खासदार आहेत, परंतु गेल्या वर्षी त्यांनी शारीरिक छळाचा आरोप केल्यापासून त्यांचे पक्षाशी संबंध बिघडले आहेत. त्या भाजपमध्ये सामील होणार अशा अफवा होत्या, पण त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि त्यांनी  पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. यामुळे मंगळवारच्या निवडणुकीत त्या कुणाला मतदान करणार याची उत्सुकता आहे. 

याशिवाय, लोकसभेतील सात अपक्ष खासदारांबद्दलही अनिश्चितता आहे. अशीच अनिश्चितता अकाली दल आणि ZPM (मिझोरम) यांच्याबाबतही आहे, प्रत्येकी एक खासदार त्यांच्याकडे आहे. या सर्व जणांनी 'राधाकृष्णन' यांना मतदान केले, तर भाजपच्या उमेदवाराला 449 मते मिळू शकतात, जे तीन वर्षांपूर्वी  धनखड यांना मिळालेल्या 528 मतांपेक्षा कमी असले तरी, ही निवडणूक जिंकण्यासाठी पुरेसे आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : Gopal Patha : 'Bengal Files'मधील ‘तो' चेहरा; 1946 च्या हिंसाचारात कलकत्ताचे तारणहार ठरलेले ‘गोपाळ पाठा' कोण? )
 

उपराष्ट्रपती निवडणूक 2025: काँग्रेसचे संख्याबळ

दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधक INDIA आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना आपला उमेदवार म्हणून निवडले आहे. दोन्ही सभागृहांचा विचार केल्यास, विरोधकांकडे 315 मते आहेत.

ही निवडणूक 2022 च्या तुलनेत अधिक चुरशीची असेल, कारण गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीतील चांगल्या कामगिरीमुळे विरोधकांकडे जास्त खासदार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्याकडे जिंकण्याची खरी संधी आहे. 100 टक्के विरोधी खासदारांनी मतदान केले आणि ते सर्व न्यायमूर्ती रेड्डी यांच्या बाजूने असले तरी, त्यांना 100 ते 135 मतांची कमी पडेल. जरी BRS, BJD, स्वाती मालीवाल, सर्व अपक्ष आणि एक-एक खासदार असलेले पक्ष आणि YSR काँग्रेस यांनीही त्यांना मतदान केले तरीही ही परिस्थिती बदलणार नाही. असे झाले तरीही INDIA आघाडी 75 मतांनी कमी पडेल.

INDIA आघाडीने या निवडणुकीत विजय मिळण्याची अपेक्षा नसल्याचे आधीच मान्य केले आहे. सूत्रांनी सांगितले की, निवडणूक लढवणे हा केवळ एक 'ऑप्टिक्स गेम' आहे. मागील उपराष्ट्रपती निवडणुकीच्या तुलनेत विरोधकांची अधिक ताकद दाखवणे आणि या वर्षी आणि पुढील वर्षी होणाऱ्या बिहार, बंगाल आणि तामिळनाडू यांसारख्या महत्त्वाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी गती मिळवणे, हा विरोधकांचा मुख्य हेतू आहे. 

कशी होते उपराष्ट्रपदीपदाची निवडणूक?

ही निवडणूक निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली घेतली जाते. आयोग एक रिटर्निंग ऑफिसर नियुक्त करतो, जो सहसा संसदेतील एक वरिष्ठ अधिकारी असतो. उमेदवाराला वैध नामांकन दाखल करण्यासाठी कमीत कमी 20 प्रस्ताव आणि 20 अनुमोदक खासदारांकडून मिळवणे आवश्यक असते. तसेच, 15,000 रुपयांची ची सुरक्षा अनामत रक्कम जमा करावी लागते.

प्रत्येक खासदार उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार क्रमवारी देतो आणि उमेदवाराला जिंकण्यासाठी साधे बहुमत, म्हणजेच एकूण वैध मतांच्या निम्म्यापेक्षा जास्त मते मिळवावी लागतात. जर पहिल्या पसंतीनुसार कोणत्याही उमेदवाराला हे बहुमत मिळाले नाही, तर सर्वात कमी मते मिळालेला उमेदवार बाद होतो आणि त्याची मते पुढील पसंतीक्रमानुसार हस्तांतरित केली जातात. ही प्रक्रिया एका उमेदवाराची निवड होईपर्यंत सुरू राहते.

Topics mentioned in this article