राजधानी दिल्ली उष्णतेनं का होरपळतीय? महानगरांमध्ये उकाडा का वाढलाय? 'हे' आहे मोठं कारण

दिल्लीत वाढत्या उष्णतेमुळे गेल्या 48 तासांमध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. तर 13 जण व्हेंटिलेटरवर आहेत. देशातील मोठी महानगरं ही Heat Wave च्या वाढत्या संकटामुळे Hear Islands होत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतामधील अनेक भागात उष्माघाताच्या घटना वाढत आहेत. दिल्लीत वाढत्या उष्णतेमुळे गेल्या 48 तासांमध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय. तर 13 जण व्हेंटिलेटरवर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सरकारी हॉस्पिटलमधील परिस्थितीचा आढावा घेतला. आरोग्य मंत्रालयानं सर्व सरकारी हॉस्पिटल्सना उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यास प्राधान्य देण्याची सूचना केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शहरांमध्ये उष्णता का वाढतेय?

देशातील मोठी महानगरं ही Heat Wave च्या वाढत्या संकटामुळे Hear Islands होत आहेत. पर्यावरणावर संशोधन करणाऱ्या सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हॉरमेंट या संस्थेच्यानुसार Heat Island Effect मुळे शहरी भागात रात्रीच्या किमान तापमानामध्येही वाढ झालीय. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम आणि उंच इमारतींची वाढलेली संख्या आहे. यामुळे उष्णता दिवसा शोषून घेतली जाते आणि रात्री उत्सर्जित केली जाते. त्यामुळे रात्री देखील लोकांना उकाडा जाणवत आहे, असं या संस्थेनं स्पष्ट केलं. 

या संस्थेचे प्रकल्प संचालक रजनीश सरीन यांनी NDTV ला दिलेल्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षांमध्ये बांधकामांची संख्या वाढलं आहे. जवळपासच्या भागात शेत जमीन होती. तिथंही आता मोठ्या प्रमाणात काँक्रेटीकरण झालंय. या इमारती दिवसा उष्णता शोषून घेतात आणि रात्री सोडताच. त्यामुळे महानगरांमध्ये रात्री देखील उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

ट्रेंडींग बातमी -  फ्लॅटच्या आकाराचं बाथरुम! चंद्राबाबूंनी जनतेसाठी उघडला माजी मुख्यमंत्र्यांचा बंगला
 

सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हॉरमेंट संस्थेनं दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगळूरुमधील Heat Wave च्या संकटांचा अभ्यास केला. त्यामध्ये जवळपास प्रत्येक शहरात गेल्या काही वर्षांमध्ये काँक्रेटीकरणामध्ये मोठी वाढ झाल्याचं त्यांना आढळलं. 

Advertisement

आद्रतेचाही परिणाम

दिल्ली, मुंबईसह देशातील 5 मोठ्या शहरांमधील आद्रतेत गेल्या 10 वर्षांमध्ये 5 ते 10 टक्के वाढ नोंदवण्यात आलीय. त्यामुळे Heat Wave चं संकट आणखी वाढलंय. सामान्य नागरिकांमधील  Heat Stress वाढत असून त्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त उकाडा जाणवत आहे.  

या विषयातील तज्ज्ञांच्या मते सध्या या संकटाचा सामना करण्यासाठी आप्तकालीन प्रतिसाद प्रणालीवर सरकारचा फोकस आहे. पण, सरकारी एजन्सींना या विषयावर नव्या रणनीतीची आखणी करण्याची गरज आहे. नव्या इमारतींच्या निर्मिती इंसुलेटेड मटेरियलनं करावी लागेल. तसंच काँक्रेटीकरणाचा वापर वेगानं कमी करावा लागेल. 

Advertisement