कोणत्याही तुरुंगातील सर्वात सुरक्षेने व्यापलेला भाग म्हणजे अंडा सेल. या कक्षाचा आकार अंड्यासारखा असतो. म्हणून त्याला अंडा सेल असं नाव देण्यात आलं आहे. या कक्षात गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेले धोकादायक कैदी ठेवले जातात. या कक्षात वीज नसते आणि कैद्यांना अंधारात ठेवले जाते. सुविधांच्या नावाखाली कैद्यांना झोपण्यासाठी एकच बेड दिला जातो. कक्षाच्या बाहेर विद्युत कुंपण असतं. आत आणि बाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. या कक्षा पूर्णपणे बॉम्बप्रूफ बनविल्या जातात. मुंबईतील सर्वात मोठ्या आर्थर रोड कारागृहात असे नऊ कक्ष आहेत.
अंडा सेलची आवश्यकता काय?
एकांत कारावास हा आधुनिक तुरुंगाच वैशिष्ट्य बनलं आहे. भारतीय तुरुंगांमध्ये अंडासेल हा एकांत कारावासाचं एक रूप आहे. अनेकांना ही शिक्षा क्रूर, अमानवीय, अपमानास्पद आणि वेदनादायी वाटतं. जीएन साईबाबांप्रमाणे भीमा कोरेगाव प्रकरणात अडकलेले प्रसिद्ध पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्ता गौतम नवलखा यांना तळाजो तुरुंगाच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.
अंडा सेल म्हणजे बंदिस्त खोली...
अरूण फरेरो यांच्या 'कलर्स ऑफ द केज' या पुस्तकात भारतीय तुरुंगातील अंडा सेलचं सर्वात ज्वलंत वर्णन करण्यात आलं आहे. त्यांच्या मते, अंडा सेल हा उच्च अंडाकृती आकाराचा, चहूबाजूंनी भिंतीच्या आत असलेला खिडकीविरहित खोली आहे. तुम्हाला बाहेरचं काहीच दिसत नाही. ना हिरवळ, ना आकाश. सर्व कक्षांच्या मध्यभागी एक टेहाळणी बुरूज आहे. अंडा सेलमधून बाहेर पडणे अशक्य आहे. कैद्यांना त्रास देण्यासाठी तशी रचना करण्यात आली आहे. कैद्याला 24 पैकी 16 तास अंडा सेलमध्ये राहावं लागतं. 8 तास सेलच्या बाहेर जाऊ दिलं जातं. मात्र हा फेरफटका केवळ एका गल्लीपूरता सीमित असतो.
तुरुंगाच्या नियमावलीनुसार...
अंडी सेल जेल मॅन्युअलद्वारे अधिकृत आहे की नाही हे स्पष्ट नाही. तरीही अंडी सेल हा भारतीय तुरुंगाचा महत्त्वाचा भाग आहे. इतर कैद्यांहून वेगळं आणि एकटं ठेवणं, तुरुंगांतर्गत आणि बाहेरील जगापासून वेगळं ठेवणं अशी सर्वोच्च न्यायालयाने एकांत कारावासाची व्याख्या केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या विधानावरून ही शिक्षा कुणालाही झाली तरी ती शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी विनाशकारी असल्याचेही दिसून येते. एका प्रकरणात सुप्रीम कोर्टाने लिहिले होते की, जर कैदी मानसिक किंवा शारीरिक छळाचा कैद्यावर टोकाचा परिणाम झाला तर त्यासाठी जेल प्रशासन जबाबदार असेल.
आयपीसीच्या कलम 73 नुसार...
आयपीसीच्या कलम 73 नुसार, कोणत्याही व्यक्तीची शिक्षा सहा महिन्यांपेक्षा कमी असेल तर त्यांना एकांत कारावासात 30 दिवसांहून अधिक काळ ठेवता येऊ शकत नाही. जर शिक्षा एक वर्षांहून कमी असेल तर हा कालावधी 60 दिवसांपर्यंत असतो. हे नियम कैद्याच्या गुन्ह्यावर अवलंबून नसतात, तर हे नियम सर्वांना लागू असतात. कलम 74 नुसार, एकांतात ठेवण्याचा कालवधी एकाच वेळी 14 दिवसांपासून अधिक असू शकत नाही. संयुक्त राष्ट्राच्या नेल्सन मंडेला नियमांनुसार, 15 दिवसांहून अधिक एकांत कारावास एक प्रकारचा छळ आहे.