वाडनाडच्या नवनिर्वाचित खासदार प्रियांका गांधी यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली. त्यांनी केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. प्रियांका गांधी जेव्हा संसदेत उभं राहून शपथ घेत होत्या त्यावेळी त्यांचे बंधू राहुल गांधी आणि आई सोनिया गांधी तेथे खासदार म्हणून उपस्थित होते. यंदा पहिल्यांदा तिन्ही गांधी एकत्रितपणे संसदेत उपस्थित होते. सोनिया गांधी या राज्यसभा तर राहुल आणि प्रियांका गांधी या लोकसभेच्या सदस्य आहेत.
नक्की वाचा - 'बटेंगे तो कटेंगे', काँग्रेस अध्यक्षांनी योगी आदित्यनाथ यांची केली दहशतवाद्याशी तुलना, Video
वायनाडमध्ये विजयी झाल्या अन् संसदेत एन्ट्री...
काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी यांनी नुकतच वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठं यश मिळवलं आहे. राहुल गांधीनी ही जागा सोडल्यानंतर त्यांची बहीण प्रियांका गांधी या निवडणुकीच्या रिंगणात उतरला. साधारण 30 वर्षांहून जास्त काळ राजकारणाचा अनुभव असल्याचं सांगणाऱ्या प्रियांका गांधी या पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि वायनाडमधून पोटनिवडणूक लढवली. त्यांनी वायनाडमध्ये माकपाचे सत्यन मोकेरी यांना तब्बल चार लाख मतांनी हरवलं.
प्रियांका गांधी पहिल्यांदाच संसदेत प्रवेश करीत होत्या. सोनेरी रंगाची काठ असलेली क्रिम रंगाची साडी नेसून प्रियांका गांधी संसदेच्या पायऱ्या चढत होत्या. राहुल गांधी पुढे निघून गेले आणि त्यानंतर त्यांनी प्रियांका गांधींना रोखलं. त्यानंतर राहुल गांधींनी खिशातून मोबाइल काढला आणि वेगवेगळ्या अँगलने प्रियांका गांधींचे फोटो काढू लागले. यावेळी नेतेमंडळीही प्रियांका गांधींच्या शेजारी उभं राहून राहुल गांधींकडून फोटो काढून घेत होते. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.