Operation Sindoor : पहलगामचा बदला, ऑपरेशन सिंदूर नाव का दिलं?

पहलगाममध्ये ज्या महिलांचं कुंकू पुसण्यात आलं त्या महिलांचा बदला दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून घेण्यात आला.  

जाहिरात
Read Time: 2 mins

भारताने पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरने दिलं आहे. या हल्ल्यात अनेक विवाहितेचं कुंकू पुसलं गेलं. आता त्यांना न्याय मिळाला आहे. विवाहितेचं सौभाग्य हिरावणाऱ्या दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कडक संदेश देण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंवर गोळ्या झाडल्या. भारतीय सैन्याने पाकिस्तान, POKमध्ये घुसून दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या या एअरस्ट्राइकमध्ये 62 लश्कर दहशतवादी आणि हँडलर मारले गेले आहेत. हा आकडा अधिक वाढू शकतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पहलगाम हल्ल्याचा हेतू काश्मिरी घाटीत दहशत पसरवणं होतं. दहशतवाद्यांनी महिलांसमोर त्यांच्या पतीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. या वेदना कधीही न पुसणाऱ्या आहेत. महिला हा धक्का आयुष्यात कधीही विसरू शकणार नाहीत. अशात भारताने जेव्हा या दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिलं तर ऑपरेशनचं नाव सिंदूर ठेवलं. ऑपरेशन सिंदूरपेक्षा योग्य नाव या ऑपरेशनला मिळू शकलं नसतं. हे सिंदूर ऑपरेशन पहलगाममधील ज्या महिलांनी आपलं कुंकू गमालला त्यांचा बदला घेण्यासाठी आहे.  

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Operation Sindoor : 'धन्यवाद मोदीजी, माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला'; पहलगाम हल्ल्यातील पीडित महिलांना अश्रू अनावर

'सिंदूर'चा बदला...
पहलगाममधील बैसरन घाटीत दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळी झाडली. यावेळी केवळ पुरुषांना टार्गेट करण्यात आलं होतं. दहशतवाद्यांनी महिलांसमोर त्यांचं कुंकू हिरावून घेतलं. भारतीय संस्कृतीत महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून भांगेत सिंदूर किंवा कुंकू लावतात. बैसरन घाटीमध्ये जेव्हा पुरुषांवर गोळी झाडण्यात आली, तेव्हा पीडित कुटुंबीयांना ते आपल्या सरकारला जाऊन सांगा..असं म्हणत होते. यावरुन त्यांनी दहशत पसरवण्यासाठी महिलांना सोडलं मात्र त्यांच्यासमोर त्यांच्या पतीला संपवलं. यानंतर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं नष्ट केली आहे. भारताने दहशतवाद्यांना कडक संदेश दिला. दहशतवादी कुठेही लपले तरीही त्यांची सुटका नाही. 

Advertisement

दहशतवाद्यांची सुटका नाही...
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये नवविवाहित जोडपे फिरण्यासाठी आले होते. यातील एका महिलेचं तर काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पहलगाम हल्ल्यानंतर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये एक नववधु आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर अगतिकता अन् डोळ्यात अश्रू दिसत होते. भारतीय सैन्याने या अश्रूंचा बदला घेतला. ज्या महिलांचं कुंकू पुसण्यात आलं त्या महिलांचा बदला दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून घेण्यात आला.