Husband And Wife Fight Viral Video : विवाहबाह्य संबंधांमुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. पत्नीला धोका देऊन पतीनं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. पत्नी-पत्नी असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो, त्यांना एकमेकांच्या अफेअरबाबत समजताच त्यांच्यात वादाची ठिणगी पडते. म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे अनेकांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला तिच्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडते आणि भर रस्त्यात त्याची धुलाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकच नव्हे तर त्या महिलेनं दुसऱ्या महिलेच्या कानशिलात लगावल्याचंही व्हिडीओ दिसत आहे.
@Gharkekalesh या ट्वीटर हँडलवर कपलचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करत यूजरने म्हटलंय, पत्नीनं पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं. या व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, एक व्यक्ती दुसऱ्या महिलेसोबत भर रस्त्यात बोलत असतो. त्याचदरम्यान, त्या व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी येते आणि त्या महिलेला थप्पड मारते. महिलेचा पती तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण संतापलेल्या महिलेनं नवऱ्यालाही चोप देण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. रस्त्यावरच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे राडा झाल्याने बघ्यांची गर्दी जमल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.
कपलच्या भांडणाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल
रस्त्यात दोन महिला आणि एक पुरुषामध्ये झालेला राडा कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घर के कलेश या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. महिलेनं पतीला दुसऱ्या स्त्री सोबत पकडलं आणि त्याला कुटण्याचा प्रयत्न केला, असं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. या एक्स यूजरने व्हायरल व्हिडीओ पती पत्नीचा असल्याचं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि व्हिडीओत असणारे लोक कोण आहेत, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीय.