Indian Railway Rules : 8 तासांपूर्वी तिकीट रद्द केलं तर रिफंड मिळेल का? भारतीय रेल्वेच्या नियमांत मोठे बदल

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या सुविधासंबंधित मोठी घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Indian Railway Rules Change : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी रेल्वे तिकीट प्रणाली आणि प्रवाशांच्या सुविधासंबंधित मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की, यापुढे ट्रेन सुटण्याच्या ८ तासांपूर्वीपर्यंत तिकीट रद्द केल्यानंतर कोणताही रिफंड मिळणार नाही. हा नवीन नियम १ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान लागू होईल.

याशिवाय दुसऱ्या रिफंड स्लॅबमध्येही बदल करण्यात आला आहे. आता २४ ते ८ तासांदरम्यान तिकीट रद्द केल्यास तिकीटाची रक्कम ५० टक्क्यांपर्यंत कापली जाईल. यापूर्वी हा कालावधी १२ ते ४ तासांपर्यंत होता. तर ट्रेन सुटण्याच्या ७२ ते २४ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तिकीटातील २५ टक्के रक्कम कापली जाईल. तर ७२ तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास संपूर्ण रक्कम परत दिली जाईल. यादरम्यान रेल्वे प्रवाशांकडून केवळ फ्लॅट चार्ज घेण्यात येईल. 

Advertisement

नक्की वाचा - RRB recruitment: रेल्वेत नोकरीची संधी! 11,000 पदांसाठी भरती, काय आहे पात्रता? पगार किती? 'असा' करा अर्ज

रेल्वे मंत्र्‍यांनी सांगितलं की, नवीन रिफंड नियम ब्लॅक मार्केटिंग आणि एजंटद्वारा शेवटच्या टप्प्यात तिकीट बुकिंग रोखण्यासाठी लागू करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ पासून सुरू झालेली वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत II ट्रेनसाठी हा नियम आधीपासून लागू आहे. त्यांनी काऊंटर तिकीट खरेदीदारांसाठी क्लास अपग्रेडची सुविधादेखील वाढवली आहे. आता ट्रेन रवाना होण्याच्या ३० मिनिटांपर्यंत प्रवासी आपल्या प्रवासाचा क्लास अपग्रेड करू शकतात.