Karnataka Crime News: भुताने झपाटल्याचा संशय, अमानुष मारहाणीत महिलेचा तडफडून मृत्यू, मुलासह तिघांना अटक 

Karnataka News : गीतम्मा निपचित पडल्यानंतर आशाने दावा केला की आत्मा निघून गेला आहे. तिला घरी घेऊन जाऊ शकता. पण घरी पोहोचताच गीतम्माची  प्रकृती आणखी बिकट झाली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Crime News : भुताने झपाटल्याच्या संशयावरून मुलाने आईला मांत्रिकाकडे नेले. तिते तांत्रिक विधा करणाऱ्या महिलेने भूत काढण्याच्या नावाखाली इतके मारहाण केली की तिचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. मुलासमोरच ही मारहाण करण्यात आली. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, 6 जुलै रोजी ही घटना घडली. गीतम्माचा मुलगा संजय याला वाटले की त्याच्या आईला भुताने पछाडलं आहे. त्यानंतर तो तिला आशा नावाच्या महिलेकडे घेऊन गेला. आशा हिने असा दावा केला होता की ती भूत घालवण्यासाठी एक विधी करते. आशा, तिचा पती संतोष सोबत गीतम्माच्या घरी गेली आणि कथित भूतबाधा सुरू केली. 

(नक्की वाचा-  Nagpur Crime : नागपुरातील कुख्यात गुंडाचा भीषण The End; विरोधी टोळीने रात्रीच्या अंधारात गेला गेम)

तिने गीतम्माला बाहेर ओढले आणि सांगितले की तिला भूत लागले आहे. नंतर तिने तिला काठीने मारहाण करायला सुरुवात केली. आशा म्हणाली की आत्मा शरीरातून निघून जाईपर्यंत तिला मारहाण करणे आवश्यक आहे. गीतम्माचा मुलगा संजय मारहाण करताना पाहत राहिला. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेली मारहाण रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सुरू झाली आणि ती पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू होती. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये गीतम्मा पाणी मागताना दिसत आहे. 

(नक्की वाचा - Pune News : पुण्यात मुस्लीम कुटुंबांच्या घरांवर बहिष्कार, अनेकांना भाड्यानं घरंही मिळेना; नेमकं काय आहे प्रकरण? )

गीतम्मा निपचित पडल्यानंतर आशाने दावा केला की आत्मा निघून गेला आहे. तिला घरी घेऊन जाऊ शकता. पण घरी पोहोचताच गीतम्माची  प्रकृती आणखी बिकट झाली. संजयने तिला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सततच्या मारहाणीमुळे, गीतम्मा जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  संजय, आशा आणि संतोष या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement


 

Topics mentioned in this article