Shocking! खोटं रील, खरोखर जीव गेला.. महिलेचा तडफडून मृत्यू; एका चुकीने भयंकर घडलं

रीलमध्ये फाशीचा सीन शूट करत होती. हे करण्यासाठी तिने छताच्या हुकला दोरी बांधली, स्टूलवर उभी राहिली आणि गळ्यात दोरी अडकवू लागली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kanpur Women Dies:  सोशल मीाडियावर व्हायरल होण्यासाठी, लाईक्स मिळण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. हटके कंटेट तयार करुन चर्चेत येण्यासाठी तरुण- तरुणी अनेक जीवघेणे स्टंट करत असतात. मात्र अनेकदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. अशीच धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. कानपूरमध्ये एका महिलेने खोट्या फाशीचे रील बनवण्याच्या नादात जीव गमवावा लागला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या... 

रीलच्या नादात रीयलमध्ये जीव गेला.. 

कानपूरच्या बांदा जिल्ह्यातील बाबेरू शहरातील करुया पुरवा येथे एका २७ वर्षीय मोहिनी नावाच्या महिलेचा इंस्टाग्राम रील शूट करताना मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये महिला गळफास घेण्याचे नाटक करत होती, परंतु तिच्या गळ्यात खरोखर फास अडकला आणि ती स्वतःला वाचवू शकली नाही. त्या महिलेचे नाव मोहिनी होते. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की मोहिनीला सोशल मीडियावर रील बनवायला खूप आवडायचे.

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्ब? 50 कोटींचा विमा आणि... आजवरचा सर्वात मोठा आरोप

मोहिनी असं या महिलेचे नाव होते, त्या मोहिनीला सोशल मीडियावर रील बनवण्याची आवड होती. ६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मोहिनी तिच्या खोलीत तिच्या मोबाईल फोनवर रील शूट करत होती. ती रीलमध्ये फाशीचा सीन शूट करत होती. हे करण्यासाठी तिने छताच्या हुकला दोरी बांधली, स्टूलवर उभी राहिली आणि गळ्यात दोरी अडकवू लागली.

गळफास लागला अन् जीव गमावला

रील बनवताना, तिचा अचानक तोल गेला आणि ती स्टुलावरुन खाली पडली. स्टुलावरुन खाली पडल्याने तिच्या गळ्यात फास अडकला अन् दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. मनोरंजनासाठी व्हिडिओ शूट करण्याच्या नादात तिचा तडफडून जीव गेला. ही घटना तिच्या ४ वर्षांच्या मुलीने खोलीत प्रवेश केला तेव्हा उघडकीस आली आणि तिने तिच्या आईला फाशीवर लटकलेले पाहिले. मुलगी मोठ्याने रडू लागली, ज्यामुळे शेजारी आणि कुटुंबातील सदस्य खोलीत धावले.

Advertisement

सुरुवातीला कुटुंबाला वाटले की मोहिनीने आत्महत्या केली आहे, परंतु नंतर तपासात असे दिसून आले की ती रील बनवत असताना हा अपघात झाला.  माहिती मिळताच बाबेरू पोलिस स्टेशन आणि पोलिस अधीक्षक पलाश बन्सल यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला. अधीक्षक पलाश बन्सल म्हणाले, "सुरुवातीच्या तपासात असे दिसून येते की ही घटना रील बनवताना घडलेला अपघात आहे. पोलिस प्रत्येक बाबीची चौकशी करत आहेत."

( नक्की वाचा : Ajit Pawar Death :बॉम्ब,कट, अपघात की घातपात? अजित पवारांच्या मृत्यूभोवतीच्या 7 मोठ्या शंका; उत्तरं कधी मिळणार? )

Topics mentioned in this article