Zomato Healthy Mode: 'झोमॅटो' बद्दल संस्थापकानेच व्यक्त केली खंत, सुरू केला 'हेल्दी मोड'

What is Zomato Healthy Mode: गोएल यांनी दावा केला आहे की ही सुविधा वापरण्यासाठी सोपी असून ती फार उत्तम असेल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या झोमॅटोने (Zomato) ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे. कंपनीचे संस्थापक दिपेंदर गोएल (Deepinder Goyal) यांनी आपल्या X अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत 'हेल्दी मोड' (Healthy Mode) ही नवी सुविधा सुरू केल्याची घोषणा केली. गोएल यांच्या मनात अनेक वर्षांपासून एक गोष्ट सलत होती, ही सल दूर करण्यासाठी आपण हा पर्याय उपलब्ध करून दिल्याची कबुली गोएल यांनी दिली आहे.

नक्की वाचा: आशिया कप विजयानंतर एलॉन मस्कने X चे ‘लाईक' बटण बदलले? व्हायरल मेसेजचे सत्य काय?

Zomato च्या दिपिंदर गोएल यांची कबुली

गोएल यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रांजळ कबुली दिली आहे, त्यांनी म्हटलंय की, "गेली अनेक वर्षे झोमॅटोबद्दल एक गोष्ट मला नेहमी सलत होती. आम्ही लोकांसाठी बाहेरून खाणे मागवणे आणि ते घरपोच करणे सोपे केले, पण लोकांना खऱ्या अर्थाने पौष्टिक (Nourishing) अन्न मिळेल यासाठी आम्ही मदत करू शकलो नाही. गोएल यांनी पुढे म्हटलंय की तुम्हाला 'झोमॅटो'वर सॅलड किंवा स्मूदी बोलसारखे पर्याय दिसत असले तरी, पौष्टीक अन्नाचे प्रकार 'झोमॅटो'वर शोधणे सोपे नव्हते. त्यामुळे, 'जास्तीत जास्त लोकांसाठी उत्तम अन्न' (Better Food for More People) या आमच्या मिशनमध्ये 'उत्तम' या शब्दाला पुरेसा अर्थ नव्हता आणि याची आम्हाला खंत होती."

झोमॅटोचा हेल्दी मोड आणि हेल्दी स्कोअर काय आहे ?

झोमॅटोचा हा 'हेल्दी मोड' कोणत्याही सामान्य हेल्दी मोडसारखा नाही. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रेस्टॉरंट्सकडून मिळवलेल्या डेटाचा आधार घेऊन प्रत्येक पदार्थाला 'हेल्दी स्कोअर' दिला जाईल. हा स्कोअर लो पासून सुपर पर्यंत असेल. हा स्कोअर केवळ कॅलरीवर आधारित नसेल. पदार्थामध्ये असलेली प्रथिने, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स यांसारख्या घटकांच्या आधारे त्या पदार्थाला स्कोअर मिळेल. यामुळे डिश हेल्दी का आहे हे कळणे ग्राहकांना सोपे जाईल.  

नक्की वाचा: आयफोन 17 Pro Max विसरा! 'हे' आहेत त्याच तोडीचे 5 जबरदस्त स्मार्टफोन; किंमतही कमी

खेळाडूही ठेवू शकतात नव्या सुविधेवर विश्वास

गोएल यांनी दावा केला आहे की ही सुविधा वापरण्यासाठी सोपी असून ती फार उत्तम असेल. सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणेच खेळाडूही डोळे बंद करून या सुविधेवर विश्वास ठेवू शकतील इतकी ही सुविधा खात्रीलायक असल्याचं गोएल यांचे म्हणणे आहे.  सध्या ही सुविधा गुरूग्राममध्ये सुरू झाली असून, लवकरच तिचा विस्तार देशभर केला जाईल असे सांगण्यात आले आहे. गोएल यांनी वापरकर्त्यांना हे फीचर वापरून त्यात काय त्रुटी आढळतात, हे मोकळेपणाने सांगण्याचे आवाहन केले आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article