जाहिरात

iPhone 17 Alternatives: आयफोन 17 Pro Max विसरा! 'हे' आहेत त्याच तोडीचे 5 जबरदस्त स्मार्टफोन; किंमतही कमी

iPhone 17 Pro Max Alternatives 5 Best Smartphones: केवळ फीचर्समध्येच नव्हे तर किंमतीच्या बाबतीतही उत्तम पर्याय ठरतात. कोणत आहेत असे स्मार्टफोन जे देतील आयफोनला टक्कर जाणून घ्या.

iPhone 17 Alternatives: आयफोन 17 Pro Max विसरा!  'हे' आहेत त्याच तोडीचे 5 जबरदस्त स्मार्टफोन; किंमतही कमी

iPhone 17 Pro Max Alternatives 5 Best Smartphones: ॲप्पलचा (Apple) नवीन आयफोन १७ प्रो मॅक्स (iPhone 17 Pro Max) ची सध्या जोरदार चर्चा आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तरुणाईची अक्षरशः झुंबड उडाली आहे. आयफोनचा १७ प्रो मॅक्स फोन जबरदस्त असली तरी त्याची किंमत प्रत्येकाच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. मात्र अनेक कंपन्यांनी आयफोनला टक्कर देणारे फ्लॅगशिप-लेव्हलचे (Flagship-Level) स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, जे केवळ फीचर्समध्येच नव्हे तर किंमतीच्या बाबतीतही उत्तम पर्याय ठरतात. कोणत आहेत असे स्मार्टफोन जे देतील आयफोनला टक्कर जाणून घ्या.

१. Google Pixel 10 Pro XL (गुगल पिक्सल १० प्रो एक्सएल)

आयफोन १७ प्रो मॅक्सला हा एक शानदार पर्याय आहे. या फोनची किंमत १,२४,९९९ रुपये आहे. ६.८ इंच एल टी पी ओ ओएलईडी (6.8 inch LTPO OLED) डिस्प्लेसह हा फोन १२० हर्ट्झ (120Hz) रिफ्रेश रेट देतो. यात ५० एमपी (50MP) मेन कॅमेरा, ४८ एमपी पेरिस्कोप टेलीफोटो (48MP Periscope Telephoto) आणि ४८ एमपी अल्ट्रा-वाइड (48MP Ultra-Wide) लेन्स आहे. ४२ एमपीचा सेल्फी कॅमेरा (42MP Selfie Camera) आणि टेन्सर जी ५ (Tensor G5) चिपमुळे हा फोन अत्यंत पॉवरफुल बनतो.

२. Samsung Galaxy S25 Ultra (सॅमसंग गॅलेक्सी एस २५ अल्ट्रा):

या फ्लॅगशिप फोनची किंमत १,०७,००० रुपये असून, हा आयफोनचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे. यात ६.९ इंच डायनॅमिक एमोलेड २ एक्स (6.9 inch Dynamic AMOLED 2X) डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन ८ एलिट (Snapdragon 8 Elite) चिपसेट आहे. २०० एमपीचा क्वाड कॅमेरा (200MP Quad Camera), ८ के (8K) रेकॉर्डिंगची क्षमता, एस पेन (S Pen) सपोर्ट आणि ७ वर्षांपर्यंतचे सॉफ्टवेअर अपडेट्स (Software Updates) मिळतात.-(iPhone 17 Pro Max Alternatives 5 Best Smartphones Information in Marathi)

Ginger Benefits: सलग 7 दिवस आले खाल्ल्यास काय होईल? डॉक्टरांनी स्टेप बाय स्टेप सांगितली माहिती

३. OnePlus Open (वनप्लस ओपन)

९९,९९९ रुपये किंमत असलेला हा फोल्डेबल स्मार्टफोन (Foldable Smartphone) इनोवेशन (Innovation) शोधणाऱ्यांसाठी सर्वोत्तम आहे. ७.८२ इंच एमोलेड (7.82 inch AMOLED) इनर डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ जेन २ (Snapdragon 8 Gen 2) चिप, ४८ एमपी हॅसलब्लाड (48MP Hasselblad) कॅमेरा आणि ४८०५ एमएएच (4805 mAh) बॅटरी याला भविष्यवेधी पर्याय बनवतात.

४. Vivo X200 Pro (विवो एक्स २०० प्रो):

या फोनची किंमत ९४,९९९ रुपये आहे. ६.७८ इंच एल टी पी ओ एमोलेड डिस्प्ले आणि ६००० एमएएच (6000 mAh) बॅटरी असलेला हा फोन डिमेंन्सिटी ९४०० (Dimensity 9400) चिपवर चालतो. २०० एमपी टेलीफोटो लेन्स (200MP Telephoto Lens) आणि ८ के व्हिडीओ रेकॉर्डिंगमुळे (8K Video Recording) तो उत्कृष्ट फोटोग्राफी (Photography) आणि परफॉर्मन्स (Performance) देतो.

५. Oppo Find X8 Pro (ओप्पो फाईंड एक्स ८ प्रो):

९९,९९९ रुपये किंमतीच्या या फोनमध्ये ६.७८ इंच एल टी पी ओ एमोलेड (6.78 inch LTPO AMOLED) स्क्रीन, एचडीआर १० प्लस (HDR10+) आणि १२० हर्ट्झ (120Hz) रिफ्रेश रेट मिळतो. हॅसलब्लाड ट्यून (Hasselblad Tuned) केलेला ५० एमपी क्वाड कॅमेरा, डिमेंन्सिटी ९४०० चिप आणि ५९१० एमएएच (5910 mAh) बॅटरी याला एक दमदार पर्याय बनवतात. काही मॉडेल्समध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी (Satellite Connectivity) देखील मिळते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com