Lady finger water : वाढतं वजन ही अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. एकदा वजन वाढलं की ते कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगितले जातात. कुणी डाएट सुरु करतं, कुणी जिममध्ये घाम गाळतं, तर कुणी उपवास सुरु करतं. आहारातील योग्य बदल काही गोष्टींचा समावेश हा देखील वजन कमी करण्याचा चांगला मार्ग आहे. वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडणारी एक सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भेंडी ही सर्वत्र सहजपणे उपलब्ध होणारी भाजी आहे. मसाला वापरुन भेंडीची भाजी लाजवाब होते. या भाजीचे अनेक फायदे आहेत. विशेषत: ज्यांना आपलं वजन नियंत्रणात आणायचं आहे, सडपातळ बांधा कायम राखायचाय त्यांच्यासाठी भेंडी अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही भेंडीचं पाणी 1 महिना प्यायलं तर तुमचं वजन कमी होऊ शकतं. हे पाणी कसं करावं हे जाणून घेऊया
कसं करणार?
भेंडीचं पाणी बनवण्यासाठी भेंडी एक ग्लास पाण्यात 24 तास भिजवणे गरजेचे आहे. त्यानंतरच याचे पोषक तत्व पाण्यात योग्य पद्धतीनं उतरतील.
कच्च्या भेंडीमध्ये आठ प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात. त्यामध्ये
कॅलरी : 31
प्रोटीन : 2 ग्रॅम
वसा : 0.2 ग्रॅम
कार्ब्स : 7 ग्रॅम
फायबर : 3 ग्रॅम
मँगनीज : दैनिक मुल्य 33% डीव्ही
सी जीवनसत्तव : 24 % डीव्ही
थियामीन : 16 % डीव्ही
फोलेट : 14 % डीव्ही
ब जीवनसत्व : 12% डीव्ही
तांबे : 12% डीव्ही
भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे
हे पाणी प्यायल्यानं तुमचं वजन कमी होतं. त्याचबरोबर यामध्ये मेटाबॉलिज्ममध्येही (How to boost metabolism) सुधारणा होते. हे पाणी रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यासही मदत करते असा निष्कर्ष काही अभ्यासातून समोर आले आहेत.
भेंडीचं पाणी साधारणत: सुरक्षित मानलं जातं. पण ज्यांना भेंडीची अॅलर्जी आहे त्यांच्यावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
यामधील काही पोषण तत्व रोग नष्ट करण्यासाठीही मदत करतात.
कसं प्यावं भेंडीचं पाणी?
साधारणपणे भेंडी 24 तास ग्लासमध्ये भिजवून त्याचं पाणी तयार केलं जातं. भेंडी एकदा पूर्णपणे भिजल्यानंतर भेंडी पिळून घेऊन हा रस पाण्यासह प्यावा. सकाळी रिकाम्या पोटी भेंडींचं पाणी पिणं फायदेशीर असते.
स्पष्टीकरण : ही सामान्य ज्ञानावर आधारित माहिती आहे. ही कोणत्याही रोगावरील उपचाराचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी तुमचे डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 'एनडीटीव्ही मराठी' यामधील कोणत्याही बातमीला जबाबदार असल्याचा दावा करत नाही.