Total Hip Replacement Surgery: 162Kg वजन, असह्य वेदनेमुळे चालणंही होतं कठीण! पण डॉक्टरांनी करून दाखवला चमत्कार

Delhi Max Hospital Hip Replacement Surgery: 162 किलो वजनाच्या तरुणावर यशस्वी टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्यात आली. कसे पार पडले ऑपरेशन? वाचा सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 4 mins
"Delhi Max Hospital Hip Replacement Surgery: 36 वर्षांच्या तरुणाला चालणंही झालं होतं कठीण, अन् मग..."
NDTV

Total Hip Replacement Surgery: अनेक वर्षांपासून उजव्या बाजूच्या नितंबामध्ये (हिप) असह्य वेदना सहन करणाऱ्या 36 वर्षीय अहमद अब्दुलमुईन कादिम यांच्यासाठी चालणे-फिरणे देखील कठीण झाले होते. इराक येथे प्रदीर्घ काळ उपचार घेतल्यानंतरही त्यांना आराम मिळत नव्हता. परिस्थिती अशी झाली होती की रोजची साधी कामे करणेही एक आव्हान बनले होते. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी नवी दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स अँड जॉइंट रिप्लेसमेंट विभागाचे चेअरमन आणि हेड डॉ. (प्रोफेसर) अनिल अरोरा यांची भेट घेतली.

अहमद यांचे वजन 162 किलो होते, ज्यामुळे ही शस्त्रक्रिया आणखी आव्हानात्मक बनली होती. त्यांना उजव्या नितंबामध्ये सेकेंडरी डिजनरेटिव्ह आर्थरायटिस (Secondary Degenerative Arthritis) होता, ज्यामुळे सतत वेदना आणि चालण्या-फिरण्यात गंभीर अडचण येत होती. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट (Total Hip Replacement) शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या सर्वाधिक वजनाच्या रुग्णांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता. जास्त वजनामुळे शस्त्रक्रियेदरम्यान सर्जिकल, भूल (अनेस्थेशिया) आणि इतर गुंतागुंतीचा धोकाही खूप जास्त होता.

Advertisement

जेव्हा वजन बनले सर्वात मोठे आव्हान (फोटो क्रेडिट: NDTV)

वजन बनले सर्वात मोठे आव्हान

रुग्णाचा लठ्ठपणा पाहता सर्जिकल टीमसमोर अनेक प्रकारची आव्हाने होती. दीर्घकालीन स्थिरता आणि उत्तम परिणाम मिळावा यासाठी डॉक्टरांना इम्प्लांट तसेच फिक्सेशन स्ट्रेटजीचे काळजीपूर्वक आकलन करावे लागले. बदललेल्या सांध्यावर पडणारा अतिरिक्त दाब लक्षात घेऊन स्टेबल फिक्सेशन, योग्य इम्प्लांट पोझिशन आणि सांध्याचे सामान्य कार्य पूर्ववत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

डॉ. अनिल अरोरा यांनी काय सांगितले?

डॉ. अनिल अरोरा यांनी याबाबत सांगितले की, "162 किलो वजनाच्या रुग्णामध्ये टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणे आव्हानात्मक होते. खूप जास्त वजनामुळे सर्जिकल एक्स्पोजर कठीण होते. यामुळे इम्प्लांटच्या पोझिशनिंगमध्ये अडचण येऊ शकते तसेच यामुळे इम्प्लांट केलेल्या कृत्रिम सांध्यावर पडणारा दाबही खूप जास्त असतो. या प्रकरणात काळजीपूर्वक प्री-ऑपरेटिव्ह प्लॅनिंग, योग्य इम्प्लांटची निवड आणि अचूक सर्जिकल अंमलबजावणीची गरज होती. या आव्हानांनंतरही आम्ही योग्य इम्प्लांट प्लेसमेंट आणि स्टेबल फिक्सेशन करण्यात यशस्वी झालो. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची तब्येत वेगाने सुधारली आहे."

(नक्की वाचा: Sarcopenic Obesity: सावध व्हा! लठ्ठपणाच नव्हे तर शरीरातील ही कमकुवत गोष्टही ठरू शकते डायबिटीजचा मुख्य कारण)

शस्त्रक्रिया यशस्वी, रिकव्हरीही उत्तम

शस्त्रक्रिया कोणतीही अडचण न येता पूर्ण झाली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या रिकव्हरीमध्ये कोणतीही अडचण आली नाही आणि फॉलो-अप एक्स-रेमध्ये हिप इम्प्लांटची पोझिशन आणि स्टेबिलिटी योग्य असल्याचे आढळून आले. अतिशय लठ्ठ रुग्णांमध्ये हिप बायोमेकॅनिक्स दुरुस्त करणे खूप कठीण असते. डॉ. अरोरा यांनी रुग्णाचा लठ्ठपणा लक्षात घेऊन कॉलर्ड स्टेम इम्प्लांटचा (Collared Stem Implant) वापर केला. अशा प्रकरणांमध्ये यशस्वी निकालासाठी अनुभवी आणि तज्ज्ञ सर्जनची आवश्यकता असते. डॉ. अनिल अरोरा गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून अशा गुंतागुंतीच्या जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करत आहेत.

अतिशय लठ्ठ रुग्णांमध्ये हिप बायोमेकॅनिक्स दुरुस्त करणे सोपे नसते. हेच लक्षात घेऊन डॉ. अरोरा यांनी कॉलर्ड स्टेम इम्प्लांटचा वापर केला. तज्ज्ञांच्या मते, अशा क्लिष्ट प्रकरणांमध्ये यशासाठी अनुभवी आणि कुशल सर्जनची भूमिका महत्त्वाची असते. 

Advertisement

(नक्की वाचा: Cauliflower Cleaning: सावधान! पावसाळ्यात फ्लॉवर खाण्यापूर्वी पाहा हा VIDEO! नाहीतर पोटात जाईल घाण, अळ्या, कीटक)

फक्त 7 दिवसांत मायदेशी वापसी

शस्त्रक्रियेनंतर अहमद यांची फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन (पुनर्वसन) सुरू करण्यात आले. त्यांच्याकडून असे व्यायाम करून घेण्यात आले ज्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या सांध्याभोवतीचे स्नायू मजबूत होऊ शकतील, गुंतागुंतीचा धोका कमी होईल आणि त्यांची चालण्याची क्षमता हळूहळू परत येईल. काही दिवसांतच त्यांना वेदनेपासून मोठा आराम मिळाला आणि त्यांच्या दैनंदिन उपक्रमांमध्येही सुधारणा पाहायला मिळाली. यशस्वी रिकव्हरीनंतर शस्त्रक्रियेच्या अवघ्या 7 दिवसांतच अहमद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आली आणि ते आपल्या देशात परतले.

लठ्ठपणा हा शस्त्रक्रिया न करण्याचे कारण नाही

डॉ. अरोरा पुढे म्हणाले, "जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमध्ये लठ्ठपणा हा एक मोठा फॅक्टर असतो, कारण यामुळे गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो आणि रिप्लेस केलेल्या सांध्यावर अतिरिक्त ताण पडू शकतो. केवळ लठ्ठपणामुळे गंभीर आर्थरायटिस आणि चालण्या-फिरण्यात प्रचंड त्रास सहन करणाऱ्या रुग्णांना या शस्त्रक्रियेसाठी अपात्र मानले जाऊ नये. रुग्णांची योग्य निवड, पूर्ण वैद्यकीय तपासणी, उत्कृष्ट सर्जिकल तंत्र आणि शस्त्रक्रियेनंतरची योग्य काळजी यासह क्लिष्ट जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया सुरक्षितपणे केली जाऊ शकते. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये मल्टि-डिसिप्लिनरी टीममधील समन्वयाची गरज असते, तसेच मोठ्या आरोग्य संस्थेची तज्ज्ञता आणि आधुनिक सुविधांमुळे यात मदत होते. आमच्या हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंटसह आधुनिक जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया नियमितपणे केली जाते; म्हणूनच आम्ही हे प्रकरण सहजपणे हाताळू शकलो."

Advertisement

टोटल हिप रिप्लेसमेंट म्हणजे काय?

टोटल हिप रिप्लेसमेंट ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी आणि चालण्या-फिरण्याची क्षमता परत आणण्यासाठी हिप जॉइंटचे खराब झालेले भाग कृत्रिम घटकांनी (आर्टिफिशिअल कंपोनंट्स) बदलले जातात. या प्रक्रियेचा सल्ला सामान्यतः अशा रुग्णांना दिला जातो ज्यांना गंभीर आर्थरायटिस असतो किंवा ज्यांच्या सांध्यांचे खूप मोठे नुकसान झालेले असते आणि ज्यांना औषधे, फिजिओथेरपी आणि इतर सामान्य उपचारांनी पुरेसा आराम मिळत नाही.

ही यशस्वी शस्त्रक्रिया नवी दिल्ली येथील मॅक्स हॉस्पिटलमधील ऑर्थोपेडिक्स अँड जॉइंट रिप्लेसमेंट, कार्डिओलॉजी, अनेस्थेशिया, फिजिओथेरपी, रिहॅबिलिटेशन आणि नर्सिंग टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे यश आहे, ज्यांनी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेल्या या जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेच्या प्रकरणात मल्टी-डिसिप्लिनरी केअर प्रदान केली.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)