Predictions for 2026 : नवीन वर्षाची चाहूल लागताच प्रत्येकाला भविष्याची चिंता आणि उत्सुकता असते. 2026 या वर्षाबद्दल प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित ऋषी द्विवेदी यांनी वर्तवलेली भविष्यवाणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या मते, 2026 हे वर्ष केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी राजकीय, आर्थिक आणि वैद्यकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आणि बदलांचे साक्षीदार ठरणार आहे.
आर्थिक मंदी आणि महागाईचे सावट
पंडित ऋषी द्विवेदी यांच्या ज्योतिषीय गणनेनुसार, 2026 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये (MNCs) मोठ्या प्रमाणावर फेरबदल होऊन कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे.
सोन्या-चांदीत तेजी
जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था डळमळीत होते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे सराफा बाजारात मोठी तेजी येईल आणि सोने-चांदीचे भाव गगनाला भिडतील. पापग्रहांची दृष्टी पडल्याने भारताच्या आर्थिक गणितावरही परिणाम होईल. मात्र, भारत या संकटातून मार्ग काढण्यात यशस्वी होईल.
(नक्की वाचा- Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)
नवीन विषाणूचे संकट
2026 च्या कुंडलीत शनी आणि राहूची युती सहाव्या भावात (रोग आणि शत्रू भाव) होत आहे. ही युती ज्योतिषशास्त्रात अशुभ मानली जाते. ही ग्रहांची स्थिती एखाद्या नवीन विषाणू किंवा महामारीला जन्म देऊ शकते, ज्यामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्था तणावाखाली येईल. एकीकडे आजारांचे संकट असताना भारत वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती करेल. नवीन औषधे आणि आधुनिक उपकरणांच्या निर्मितीमध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल.
जागतिक राजकारण आणि युद्धाची शक्यता
जागतिक स्तरावर सीमावाद आणि सत्तेसाठी संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. कुंडलीत एकाच राशीत 4 पेक्षा जास्त ग्रहांची युती होत असल्याने मोठ्या युद्धाची भीती आहे. काही देशांमध्ये सीमावाद विकोपाला जाऊन रक्तापात होण्याची शक्यता आहे. कूटनीती आणि परराष्ट्र धोरणाच्या जोरावर भारत जागतिक पटलावर आपला दबदबा निर्माण करेल. आयात-निर्यात क्षेत्रात भारताचा वाटा वाढलेला पाहायला मिळेल. भूकंप, पूर आणि वादळांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता द्विवेदी यांनी वर्तवली आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)