New Year 2026: घरातच नववर्ष कसं साजरं कराल? 4 सर्वात मजेशीर पद्धती, अस्सं सेलिब्रेशन कायम स्मरणात राहील!

New Year Eve Celebration 2026 : २०२५ संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे घराघरांमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
घरातच नव्या वर्षाचं सेलिब्रेशन कसं कराल?

New Year 2026 : २०२५ संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे घराघरांमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. कोणी डोंगरात ट्रिप करण्याचा प्लान करीत आहेत, तर कोणी मित्र-मैत्रिणींसह पार्टी करण्याचा प्लान करत आहे. काहीजणं मात्र घरातच छोटेखानी कार्यक्रमाची आखणी करीत आहेत. प्रत्येकासाठी नवीन वर्षाचं सेलिब्रेशन खास असतं. आज आम्ही तुम्हाला सेलिब्रेशनचे विविध प्रकार सांगणार आहोत. ज्यामुळे गर्दीत न जाता, आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्ही नवीन वर्ष अधिक आनंदात साजरा करू शकाल, जे वर्षभर तुमच्या स्मरणात राहील. 

यंदाचं नववर्ष कसं कराल सेलिब्रेट?

१ घरातच कसा पजामा पार्टी...

नव्या वर्षानिमित्ताने तुम्ही घरात पजामा पार्टी ठेवू शकता. यासाठी तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलावू शकता आणि त्यांच्यासोबत छान सायंकाळी घालवू शकता. अशा प्रकारचं सेलिब्रेशन आनंदासाठी असतं, यात कोणताही दिखावा नसतो आणि कोणताही दबाव नसतो. अशावेळी तुम्ही एकमेकाच्या सान्निध्यात आरामात रात्र घालवू शकता. 

२ पार्टनरसोबत सिनेमा पाहा...

तुम्हाला गर्दीपासून दूर जायचं असेल तर न्यू इअर सेलिब्रेशनसाठी चित्रपटाचा प्लान करू शकता. यासाठी तुम्ही स्नॅक्स, सॉफ्ट लाइटिंगसह घरात छोटासा सिनेमा सेटअप करू शकता. नवीव वर्षाच्या सायंकाळी आपल्या पार्टनरसोबत एखादा चांगला चित्रपट पाहणं नक्कीच आनंददायी असेल. 

Advertisement

नक्की वाचा - शरीरात अल्कोहोल किती काळ टिकतो? चाचणीत दारू किती काळापर्यंत आढळून येते? वाचा सविस्तर

३ गेम नाइट्सचं आयोजन करा...

नवीन वर्षानिमित्ताने ३१ डिसेंबरला तुम्ही मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना घरी बोलावून गेम नाइटचं आयोजन करू शकता. राऊंड्समध्ये गेम खेळणं अधिक मजेशीर ठरू शकतं. सुरुवात टीमबेस्ड गेमने रा आणि हळूहळू वेळ मिळेल तसा वैयक्तिक गेमही ठेऊ शकता. यामुळे नवीन वर्षाचं सेलिब्रेशन उत्साही आणि मनोरंजक ठरेल. 

४ डिनर पार्टी...

न्यू इअर सेलिब्रेशनसाठी डिनर पार्टीचं आयोजन करणं चांगला पर्याय आहे. मजेशीर जेवणासह घरात थोडीशी सजावट करू शकता. कॅडल लाइट आणि म्युझिकचं आयोजन करून माहोल तयार करा. जेवणानंतर गेम्स किंवा चित्रपटाचा प्लान करू शकता. 

Advertisement

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

Topics mentioned in this article